Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs West Indies: पहिल्याच कसोटीतून तिघांचे पदार्पण? पाहा भारताची संभाव्य 'प्लेइंग-11'

WI vs IND: वेस्ट इंडिजविरुद्ध 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st test Predicted Playing XI: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, टी20 आणि वनडे अशा तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. 12 जुलैपासून या दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिकामधील रोसौ येथी विंडसर पार्कमध्ये खेळणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

तीन खेळाडूंचे पदार्पण?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यातील जयस्वास आणि मुकेश कुमार पहिल्या कसोटी सामन्यातून पदार्पण करण्याची शक्यता आहे.

जयस्वालला चेतेश्वर पुजाराच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. भारताच्या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली हे प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाजी फळीत कायम असण्याचीच शक्यता दाट आहेत.

याशिवाय वेगवान गोलंदाज असलेल्या मुकेशलाही गोलंदाजी फळीत संधी दिली जाऊ शकते. सध्याच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांचा समावेश नसल्याने मुकेशची प्लेइंग इलेव्हनमधील निवड जवळपास पक्की मानली जात आहे.

त्याच्याबरोबर वेगवान गोलंदाजीसाठी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनाही संधी दिली जाऊ शकते. याशिवाय आर अश्विन आणि रविंद्र जडेजा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतात.

यष्टीरक्षक म्हणून इशानला संधी

सध्या भारताकडे यष्टीरक्षक म्हणून इशान किशन आणि केएस भरत या दोघांचा पर्याय आहे. पण केएस भरतने गेल्या काही सामन्यांमध्ये भारताकडून प्रभावी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे इशान किशनला आजमावले जाऊ शकते.

जर इशानला पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर हे त्याचे कसोटी पदार्पणही असेल. इशानने यापूर्वी भारताकडून वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पण अद्याप त्याचे कसोटी पदार्पण झालेले नाही.

पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT