Ishant Sharma
Ishant SharmaDainik Gomantak

India vs West Indies: इशांत शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यात दिसणार, पण 'या' नव्या भूमिकेत

Ishant Sharma: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून 12 जुलैपासून कसोटी मालिका खेळणार आहे.
Published on

Ishant Sharma in New Role during West Indies vs India Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला 2 कसोटी सामन्यांची, 3 वनडे सामन्यांची आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

इशांत गेल्या दीड वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे. दुखापती आणि फॉर्मशी तो गेल्या काही काळापासून झगडत होता, त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच आता असे समोर आले आहे की इशांत भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात समालोचन करताना दिसणार आहे.

इशांत वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील आगामी मालकेत समालोचकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे जिओ सिनेमाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता समालोचक म्हणून इशांतचे हे पदार्पण असणार आहे.

Ishant Sharma
Ishant Sharma on MS Dhoni: 'जर माहित होतं...', जेव्हा धोनी विराटवर चिडलेला, इशांतने ऐकवला किस्सा

भारतीय संघातून बाहेर

वयाच्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशांत त्याच्या कारकिर्दीतील भारताकडून अखेरचा सामना 25 ते 29 नोव्हेंबर 2021 दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे खेळला आहे. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तो नुकताच आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसला होता.

दरम्यान, इशांतने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे दिनेश कार्तिक प्रमाणेच तो क्रिकेटमध्ये सक्रिय असूनही समालोचन करताना दिसणार आहे. दिनेश कार्तिकही अद्याप भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून सक्रिय आहे. पण याचबरोबर तो विविध मालिकांमध्ये समालोचनही करताना दिसतो.

Ishant Sharma
Ishant Sharma on Virat Kohli: 'विराटप्रमाणे माझ्याबरोबर तसं घडलं असतं, तर मैदानावरच गेलो नसतो...', इशांतने सांगितली आठवण

इशांतने खेळलेत 100 कसोटी

भारताकडून 100 कसोटी सामने खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी इशांत देखील आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 105 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 311 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटीत 11 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच त्याने एकदा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे.

इशांतने वनडेत 80 सामने खेळले असून 115 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 14 सामने खेळले असून 8 विकेट्स घेतल्या आहेत.

असे आहे भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका

    20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

  • वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

  • टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

    6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

    13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com