Ayhika Mukherjee X/WTTGlobal
क्रीडा

World Team Table Tennis C'Ships: भारताच्या अहिका-श्रीजाने रचला इतिहास; चीनच्या अव्वल दोन खेळाडूंना चारली पराभवाची धूळ

Ayhika Mukherjee-Sreeja Akula: वर्ल्ड टीम टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या अहिका आणि श्रीजा यांनी चीनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

India paddlers Ayhika Mukherjee, Sreeja Akula made history as they beat Chinese World No 1 and No 2 players:

भारताच्या महिला टेबल टेनिस संघाकडून अहिका मुखर्जी आणि श्रीजा अकुला यांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. सध्या दक्षिण कोरियातील बुसान येथे आयटीटीएफ वर्ल्ड टीम टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शु्क्रवारी भारताचा सामना बलाढ्य चीनविरुद्ध होता.

मात्र, भारतीय संघाने चीनला अखेरपर्यंत विजयासाठी संघर्ष करायला लावला. जागतिक क्रमवारीत १५५ व्या क्रमांकावर असलेल्या अहिकाने अव्वल क्रमांकावर असलेल्या सन यिंगशाला पराभवाचा जोरदार धक्का दिला.

विशेष म्हणजे यिंगशाने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय सांघित स्पर्धेत २६ एकेरी सामन्यात कधीही पराभव स्विकारलेला नव्हता. अहिकाने 12-10, 2-11, 13-11, 11-6 अशा फरकाने यिंगशाला पराभवाचा धक्का दिला.

इतकेच नाही, तर 49 व्या क्रमांकावर असलेल्या श्रीजा अकुलाने दुसऱ्या क्रमांकावरील वँग यिडी हिला पराभवाचा धक्का दिला होता. तिने सरळ तीन सेटमध्ये यिडीला 11-7, 11-9, 13-11 पराभूत केले.

चीनच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू पराभूत झाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला होता. मात्र, नंतर चीनने पुनरागमन करता भारताविरुद्धची लढाई 3-2 फरकाने जिंकली.

या लढतीत भारताची स्टार खेळाडू मनिका बत्राला वँग मन्यू आणि यिंगशा विरुद्ध दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तिला मन्यूने 3-11, 8-11, 15-13, 7-11 अशा फरकाने पराभूत केले, तर यिंगशाने 3-11, 6-11, 13-11, 9-11 अशा फरकाने पराभव केला.

याशिवाय अखेरचा आणि निर्णायक सामना अहिका चौथ्या क्रमांकावरील मन्यू विरुद्ध खेळली. मात्र तिला या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले. तिला मन्युने 9-11, 11-13, 6-11 अशा फरकाने पराभूत केले.

चीनने या लढतीत अटीतटीचा विजय मिळवला असला, तरी 2010 नंतर पहिल्यांदाच चीनने चॅम्पियनशीपमध्ये दोन सामने पराभूत झाले आहेत. यापूर्वी गेल्या 14 वर्षात टेबल टेनिसमध्ये चीनचेच वर्चस्व राहिले आहे.

दरम्यान, भारताचा पुढील सामना आता हंगेरीविरुद्ध रविवारी (18 फेब्रुवारी) होणार आहे. या लढतीला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. या स्पर्धेतून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT