Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: गिलने पाचवं वनडे शतक ठोकत धोनी, विराटसारख्या दिग्गजांनाही टाकलं मागे, पाहा 3 मोठे विक्रम

IND vs BAN: शुभमन गिलने आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध शतक ठोकत ३ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Shubman Gill Century Against Bangladesh in Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोरचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी पार पडला. या सामन्यात बांगलादेशने भारताविरुद्ध 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. पण असे असले तरी या सामन्यात भारताकडून शुभमन गिलने केलेल्या शतकाने सर्वांचेच लक्ष वेधले.

अन्य भारतीय फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर स्थिरावण्यास संघर्ष करावा लागत असतानाच गिलने दुसरी बाजू भक्कमपणे सांभाळताना 133 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

शुभमन गिल आशिया चषक स्पर्धेत शतक करणारा भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याने धोनीचा विक्रम मागे टाकला आहे. शुभमन गिलने शुक्रवारी शतक केले, त्यावेळी त्याचे वय 24 वर्षे 7 दिवस इतके होते. तसेच धोनीने 26 वर्षे 354 दिवस वय असताना 2008 मध्ये आशिया चषकात पहिले शतक झळकावले होते.

या यादीत अव्वल क्रमांकावर सुरेश रैना आहे. त्याने 21 वर्षे 211 दिवस वय असताना 2008 मध्ये आशिया चषकात शतक ठोकले होते.

आशिया चषकात शतक ठोकणारे भारताचे सर्वात युवा खेळाडू -

  • 21 वर्षे 211 दिवस - सुरेश रैना (2008)

  • 21 वर्षे 350 दिवस - सचिन तेंडुलकर (1995)

  • 23 वर्षे 129 दिवस - विराट कोहली (2012)

  • 24 वर्षे 07 दिवस - शुभमन गिल (2023)

  • 26 वर्षे 354 दिवस - एमएस धोनी (2008)

शुभमन गिलने टाकलं दिग्गजांना मागे

दरम्यान, गिलचे हे वनडेतील 32 वा डाव होता. त्यामुळे त्याने वनडेत 5 शतके करण्यासाठी सर्वात कमी डाव खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर शिखर धवन असून त्याने 28 डावातच 5 वनडे शतके झळकावली होती.

दरम्यान, केएल राहुलने 36 डावात आणि विराट कोहलीने 43 डावात 5 वनडे शतके झळकावलेली. त्यामुळे हे दोघे या विक्रमाच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

याशिवाय 32 वनडे डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुभमन गिलने अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याच्या आता 1712 धावा झाल्या आहेत. त्याने याबाबतीत हाशिम आमलाला मागे टाकले आहे.

हाशिम आमलाने पहिल्या 32 वनडे डावात 1558 धावा केल्या होत्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम असून त्याने 1558 धावा पहिल्या 32 वनडे डावात केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

POP Idols: देवाच्या उत्सवातही भेसळ! पीओपी मूर्तींना शाडूचा लेप लावून होतेय विक्री; विसर्जनस्थळी अजूनही मूर्तींचा खच

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

SCROLL FOR NEXT