South Africa PTI
क्रीडा

SA vs IND: मार्करमचे झुंझार शतक, तर बुमराहच्या 5 विकेट्स! भारतासमोर ऐतिहासिक विजयासाठी 79 धावांचं लक्ष्य

South Africa vs India: केपटाऊन कसोटीत विजयासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (3 जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 36.5 षटकात 176 धावांवर संपला.

मात्र, पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकने 98 धावांची पिछाडी स्विकारलेली असल्याने त्यांनी भारतासमोर विजयासाठी 79 धावांचे आव्हान ठेवले आहे. जर हा सामना भारताने जिंकला, तर मालिकेत बरोबरी होईल; याबरोबर भारत केपटाऊनमध्ये पहिला कसोटी विजय देखील नोंदवेल. यापूर्वी भारताला केपटाऊनमध्ये कसोटीत विजय मिळवता आलेला नाही.

दरम्यान, दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करमने शतकी खेळी केली, तर भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 18 व्या षटकापासून आणि 3 बाद 62 धावांपासून पुढे खेळायला सुरू केले. पण 18 व्या षटकात डेव्हिड बेडिंगहॅमला जसप्रीत बुमरागहने चकवले. त्यामुळे तो 11 धावांवर बाद झाला.

यानंतर सलामीपासून एक बाजू सांभाळलेल्या एडेन मार्करमला साथ देण्यासाठी काईल वेरेयन आला. त्याने त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला, मात्र 22व्या षटकात त्यालाही बुमराहने 9 धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ मार्को यान्सिनही 11 धावांवर बाद झाला, तर केशव महाराजनेही 3 धावांवर विकेट गमावली.

या विकेट्स जात असताना मार्करम शानदार खेळ दुसऱ्या बाजूने करत होता.त्याला अखेरीस कागिसो रबाडाने साथ दिली. त्यांच्यात 51 धावांची भागीदारीही झाली. यादरम्यान मार्करमने शतकही पूर्ण केले. त्याने 99 चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले.

मात्र, शतकानंतर त्याला 32 व्या षटकात मोहम्मद सिराजने बाद केले. त्याचा झेल रोहित शर्माने घेतला. मार्करमने 103 चेंडूत 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 2 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात कागिसो रबाडाही 12 चेंडूत 2 धावा करून बाद झाला.

यानंतर शेवटच्या विकेटसाठी नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी यांनी 14 धावा जोडल्या. अखेर बुमराहने लुंगी एन्गिडीला 8 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. नांद्र बर्गर 6 धावांवर नाबाद राहिला.

या डावात पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने डीन एल्गार (12), टोनी डी झोर्झी (1) आणि ट्रिस्टन स्टब्स (1) या तिघांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या.

या डावात भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर संपला होता, तर भारताचा पहिला डाव 153 धावांवर संपला. त्यामुळे भारताने 98 धावांची आघाडी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT