Team India BCCI
क्रीडा

World Cup 2023: जड्डू-कुलदीपच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली, भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान

India vs Australia: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत चेन्नईला सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 200 धावांचे आव्हान दिले आहे.

Pranali Kodre

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 200 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली, पण त्यांचा संघ 49.3 षटकात 199 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीला डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श उतरले होते. मात्र, त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मार्श तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देत शुन्यावर बाद झाला. परंतु, त्यानंतर वॉर्नरला स्टीव्ह स्मिथने चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच कुलदीप यादवने 17 व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेल घेतला. वॉर्नर 52 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. यानंतर स्मिथला साथ देण्यासाठी मार्नस लॅब्युशेन आला होता. त्यांनी दोघांनी ऑस्ट्रेलियाला 100 धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र, त्यांची जोडी अधिक धोकादायक ठरण्यापूर्वीच रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीचे जाळे टाकले. त्याने 28 व्या षटकात स्मिथला त्रिफळाचीत केले, तर 30 व्या षटकात लॅब्युशेन आणि ऍलेक्स कॅरेला माघारी धाडले. स्मिथने 71 चेंडूत 46 धावा केल्या. लॅब्युशेन 27 धावांवर बाद झाल, तर कॅरेला भोपळाही फोडता आला नाही.

यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मॅक्सवेलचा अडथळा 36 व्या षटकात कुलदीप यादवने दूर केला. त्याने मॅक्सवेलला 15 धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच षटकात ग्रीनला आर अश्विनने 8 धावांवर माघारी धाडले.

परंतु, त्यांनंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने चिवट झुंज दिली. यावेळी झम्पानेही 20 चेंडू खेळत 6 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 200 धावांचे आव्हान ठेवण्यात यश आले. कमिन्सने 15 धावा केल्या, तर स्टार्कने 28 धावा केल्या.

भारताकडून जडेजा आणि कुलदीप यांच्याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT