Indian Cricket Team | Asian Games Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: जयस्वालच्या धमाक्यानंतर गोलंदाजांनीही दाखवली चमक! टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये

Pranali Kodre

India men's Cricket team won Quarter Final Match against Nepal by 23 runs: चीनमध्ये सुरु असलेल्या 19 व्या आशिआई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळविरुद्ध 23 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह भारताने पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय देखील ठरला आहे.

उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नेपाळसमोर विजयासाठी 203 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळ संघाला 20 षटकात 9 बाद 179 धावाच करता आल्या.

नेपाळकडून कुशल भुर्टेल आणि असिफ शेख यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, असिफ चौथ्याच षटकात 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुशल भुर्टेल (28) आणि कुशल मल्ला (29) यांनी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विकेट्स गमावल्या. कर्णधार रोहित पौडेल ३ धावांवरच बाद झाला.

भारताकडून आर साई किशोर, अवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी वरच्या फळीला धक्के दिल्यानंतर मात्र, दिपेंद्र सिंग आणि संदीप जोरा यांनी 45 धावांची भागीदारी करत नेपाळला 120 धावांचा टप्पा पार करून दिला.

त्यांची जोडी जमली असतानाच बिश्नोईने दिपेंद्रला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर संदीपही 29 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र, नेपाळची खालची फळी झटपट बाद झाली आणि भारताने विजय मिळवण्यात यश मिळवले.

भारताकडून अवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर आर साईकिशोरने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फायदा घेत यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत भारताला दमदार सुरुवात दिली. त्याला दुसऱ्या बाजूने कर्णधार ऋतुराज गायकवाडने संयमी साथ दिली.

या दोघांनी पहिल्या 10 षटकांच्या आतच शतकी भागीदारी केली होती. पण ऋतुराज 25 धावांवर 10 व्या षटकात बाद झाला. त्याच्यापाठोपाठ तिलक वर्मा (2) आणि जितेश शर्मा (5) हे देखील स्वस्तात बाद झाले.

मात्र, दुसऱ्या बाजूने शानदार खेळ करणाऱ्या जयस्वालने शतक पूर्ण केले. तो आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला. मात्र शतकानंतर त्याला लगेचच दिपेंद्र सिंगने बाद केले. जयस्वालने 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावांची खेळी केली.

त्यानंतर शिव दुबे आणि रिंकू सिंग यांनी अखेरीस आक्रमक खेळत भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 202 धावा केल्या. शिवम दुबेने 19 चेंडूत 25 धावा केल्या, तर रिंकूने 15 चेंडूत नाबाद 37 धावा फटकावल्या.

नेपाळकडून दिपेंद्र सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच सोमपाल कामी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT