Asian Games 2023: भारताने हॉकीमध्ये बांगलादेशचा उडवला धुव्वा, उपांत्य फेरीत चीनशी मुकाबला!

Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक यश मिळाले आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक यश मिळाले आहे. हॉकी सामन्यात भारताने बांगलादेशचा एकतर्फी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशचा 12-0 असा पराभव करत सामना जिंकला.

अशा प्रकारे भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी हॅट्ट्रिक गोल करत प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने गटातील पाचही सामने जिंकले आहेत.

टीम इंडिया 3 ऑक्टोबरला चीनशी भिडणार

आशिया कपमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. भारताने हॉकीच्या 5 गट सामन्यात एकूण 58 गोल केले आहेत. त्याचवेळी, प्रतिस्पर्धी संघाला केवळ 5 गोल करता आले. हॉकीमध्ये भारताशी टक्कर देऊ शकणारा कोणताही संघ सक्षम नाही, हे यावरुन स्पष्ट होते.

भारतीय खेळाडूंनी अशीच कामगिरी करत राहिल्यास भारत हॉकीमध्येही सुवर्णपदक पटकावणार हे निश्चित मानले जात आहे. आता टीम इंडिया 3 ऑक्टोबरला चीन विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळू शकते.

चीन (China) अजून उपांत्य फेरी गाठू शकलेला नाही, मात्र भारताविरुद्ध फक्त चीनच उपांत्य फेरी खेळू शकेल अशी अटकळ बांधली जात आहे.

Team India
Asian Games 2023: सुतीर्था आणि अहिका जोडीचा कारनामा, टेबल टेनिसमध्ये जिंकले कांस्यपदक!

भारताने दुसऱ्याच मिनिटाला गोल केला

दरम्यान, या सामन्यात भारत बांगलादेशवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत होता. भारतीय कर्णधार हरमनप्रीतने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर तिसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीतने दुसरा गोल केला.

तेव्हापासून बांगलादेशवर (Bangladesh) प्रचंड दबाव जाणवत होता. यानंतर मनदीप सिंगने तिसरा गोल केला. त्यानंतर 23व्या मिनिटाला ललित उपाध्यायने चौथा गोल केला. अशाप्रकारे भारत एकापाठोपाठ एक गोल करत राहिला आणि खेळ संपेपर्यंत त्यांनी एकूण 12 गोल केले.

तर दुसरीकडे, बांगलादेशला एकही गोल करता आला नाही आणि सामना 12-0 असा भारताने जिंकला. आता चाहत्यांच्या नजरा 3 ऑक्टोबरला होणाऱ्या उपांत्य फेरीकडे असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com