Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास, Asian Games मध्ये शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय

Yashasvi Jaiswal च्या आधी टी-20मध्ये सुरेश रैना, केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली आहेत.
Yashasvi Jaiswal created history, by becoming the first Indian to score a century at the Asian Games.
Yashasvi Jaiswal created history, by becoming the first Indian to score a century at the Asian Games.Dainik Gomantak

Yashasvi Jaiswal created history, by becoming the first Indian to score a century at the Asian Games:

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात शतक झळकावत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

चीनमधील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा 2022 च्या पुरुष क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

जैस्वालने 48 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक झळकावल्यानंतर त्याला आपला डाव पुढे नेता आला नाही. आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

शतक पूर्ण केल्यानंतर जैस्वाल T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा आठवा भारतीय फलंदाज ठरला.

त्याच्याआधी सुरेश रैना, केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली आहेत.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 204 धावा केल्या. यामध्ये यैस्वाल 100 धावा, रिंकू सिंग 37, ऋतुराज गायकवाड 25 धावा आणि शिवम दुबेने 25 धावांचे योगदान दिले.

नेपाळकडून दिपेंद्र सिंगने सर्वाधिक 2 बळी मिळवले. तर संदीप लमिचेने आणि संपल कामीने प्रत्येकी 1 बळी मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com