Shubman Gill & Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 4th T20I: शुभमन-जयस्वालचा 'जलवा', भारताची टी-20 मालिकेत बरोबरी

WI vs IND, 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा T20 सामना अमेरिकेतील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क फ्लोरिडा येथे खेळवला गेला.

Manish Jadhav

WI vs IND, 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा T20 सामना अमेरिकेतील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क फ्लोरिडा येथे खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 8 गडी गमावून 178 धावा केल्या. टीम इंडियाला 179 धावांचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र टीम इंडियाच्या युवा फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

चौथा टी-20 सामना जिंकून भारताने टी-20 मालिकेत बरोबरी साधली आहे. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या जोडीने तूफानी खेळी खेळली.

दरम्यान, शिमरॉन हेटमायरच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने (West Indies) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 9 विकेट्स राखून हा सामना जिंकला.

वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.

त्याच्याशिवाय शाई होपने साधारण खेळी खेळली. हे दोघे वगळता वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

भारताकडून (India) अर्शदीप सिंहने 38 धावांत 3 बळी घेतले. मात्र, शेवटच्या षटकात त्याने 17 धावा दिल्या. कुलदीप यादवने दोन तर यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसरा टी-20 सामना 7 विकेटने जिंकला होता. याआधी वेस्ट इंडिजने पहिले दोन सामने जिंकले होते. 2006 मध्ये वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध शेवटची मालिका जिंकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT