Hockey India Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy Hockey: भारताने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ! हरमनप्रीतची कर्णधार पदाला साजेशी कामगिरी

India vs Pakistan: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारत अपराजित राहिला आहे.

Pranali Kodre

Indian Hockey Team beat Pakistan 4-0 in Asian Champions Trophy Chennai 2023:

आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने बुधवारी (9 ऑगस्ट) पाकिस्तान हॉकी संघाला पराभूत केले. हा या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना होता. त्यामुळे भारताने साखळी फेरीत अपराजित राहात गुणतालिकेत अव्वल क्रमांक कायम ठेवला आणि उपांत्य फेरीतही दणक्यात प्रवेश केला आहे.

चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 4-0 फरकाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने शानदार कामगिरी बजावली. भारतासाठी हरमनप्रीतने 2 गोल नोंदवले, तर जुगराज सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

भारताचा आता उपांत्य फेरीतील सामना जपानविरुद्ध 11 ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. यापूर्वी भारताला जपानविरुद्ध साखळी फेरीत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

पाकिस्तानचे स्वप्न भंगले

दरम्यान, भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.

पाकिस्तान गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे आता पाकिस्तानला सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या चीन संघाविरुद्ध 11 ऑगस्ट रोजी सामना खेळायचा आहे. यातून अंतिम 5 वे आणि 6 वे स्थान निश्चित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आधी संबंध ठेवता अन् नंतर मुलींच्या चारित्र्यावर संशय घेता?", लिव्ह-इन नात्यावर हायकोर्टाची कठोर टिप्पणी; काय नेमकं प्रकरण?

Pakistani Army: दहशतवादाचं फंडिंग आणि पश्तूनांची हत्या! दावोसमध्ये पाकिस्तानी लष्कराचा फाटला बुरखा

Old Buses in Goa: कालबाह्य बसगाड्यांमुळे गोव्याची हवा झाली विषारी! प्रदूषणाचे नियम धाब्यावर; प्रवाशांचा जीव टांगणीला

BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

SCROLL FOR NEXT