Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: चुकीला माफी नाही! पराभवानंतर आता ICC ची टीम इंडियावर कारवाई

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाकडून झालेल्या चूकीसाठी आयसीसीकडून कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Team India: रविवारी भारताने बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला. या सामन्यात भारताला 1 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. पण आता याबरोबरच भारताला या सामन्यातील आणखी एक चूक महागात पडली आहे.

या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने 4 षटके सामनाधिकारी रंजन मदुगल्ले यांनी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा उशीरा टाकली.

आयसीसीच्या (ICC) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार प्रत्येक षटकाच्या कमी गतीमागे खेळाडूंच्या सामनाशुल्काच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे भारतीय संघाला 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चूक मान्य केली आहे. भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्याचा आरोप मैदानातील पंच मायकल गॉफ आणि तन्वीर अहमद, तसेच तिसरे पंच शरफुद्दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी ठेवला होता.

दरम्यान, भारतीय संघ पहिल्या वनडेत पराभूत झाल्याने मालिकेतही 0-1 असा पछाडला आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर भारताला 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची डरकाळी! डिचोली परिसरात दहशत; रात्री रस्त्यांवर शुकशुकाट

Vasco Accident: टेम्पो-मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात, दोन्‍ही चालक जखमी; वाहतूक काही काळ ठप्प

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

SCROLL FOR NEXT