Indian Football Team Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2026 Qualifiers: भारतीय फुटबॉल संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने; एशियन गेम्सची गटवारीही जाहीर

India Football Team: भारतीय फुटबॉल संघाचे फिफा वर्ल्डकप 2026 एएफसी क्वालिफायरचे वेळापत्रक समोर आले असून एशियन गेम्ससाठी गटवारीही जाहीर झाली आहे.

Pranali Kodre

India football team Asian Games 2023 and FIFA World Cup 2026 AFC qualifiers Draw:

भारतीय फुटबॉल संघासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक चांगल्या बातम्या येत आहेत. नुकतेच भारतीय महिला आणि पुरुष संघाला एशियन गेम्समधील सहभागासाठी भारतीय सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

त्याचबरोबर आता 2026 साली होणाऱ्या फिफा वर्ल्डकप एएफसी क्वालिफायरचे वेळापत्रकही समोर आले आहे. इतकेच नाही, तर एशियन गेम्ससाठीची गटवारीही जाहीर झाले आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 एएफसी क्वालिफायर

फिफा वर्ल्डकप 2026 एएफसी क्वालिफायर स्पर्धेत भारताचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये भारतासह एशियन चॅम्पियन्स कतार आणि कुवेत हे संघ असणार आहेत. याशिवाय पहिल्या राउंडमधून मंगोलिया किंवा अफगाणिस्तान यांच्यातील पात्र ठरणारा संघ असणार आहे. भारताचा थेट दुसऱ्या राउंडमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 एएफसी क्वालिफायर स्पर्धेचा दुसरा राउंड 16 नोव्हेंबर 2023 ते 11 जून 2024 दरम्यान पार पडणार आहे. यादरम्यान एकूण 36 संघ खेळणार आहेत. यातील भारतासह 26 संघांना दुसऱ्या राउंडमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. तसेच 10 संघ पहिल्या राउंडमधून दुसऱ्या राउंडमध्ये प्रवेश करतील.

या 36 संघांना 9 गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांबरोबर होम-अवे (मायदेशात आणि परदेशात) अशा पद्धतीने सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक ग्रुपमधून अव्वल दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. तसेच पुढच्या फेरीत प्रवेश केलेले 18 संघ 2027 एएफसी एशियन कप स्पर्धेसाठीही पात्र ठरतील.

फिफा वर्ल्डकप 2026 एएफसी क्वालिफायर स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक

  • 16 नोव्हेंबर 2023 - कुवेत विरुद्ध भारत (कुवेत)

  • 21 नोव्हेंबर 2023 - भारत विरुद्ध कतार (भारत)

  • 21 मार्च 2024 - अफगाणिस्तान/मंगोलिया विरुद्ध भारत (ठिकाण अद्याप निश्चित नाही)

  • 26 मार्च 2024 - भारत विरुद्ध अफगाणिस्तान/मंगोलिया (भारत)

  • 6 जून 2024 - भारत विरुद्ध कुवेत (भारत)

  • 11 जून 2024 - कतार विरुद्ध भारत (कतार)

एशियन गेम्ससाठी गटवारी जाहीर

भारतीय महिला आणि पुरुष फुटबॉल संघ 9 वर्षांनंतर एशियन गेम्समध्ये खेळताना दिसणार आहे. यंदा चीनमध्ये सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान एशियन गेम्स 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघ चीन, बांगलादेश आणि म्यानमारसह साखळी फेरीत अ गटात असेल. तसेच भारतीय महिला फुटबॉल संघ साखळी फेरीसाठी ब गटात असून तैवान आणि थायलंड हे संघही या गटात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT