Hockey Asia Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

Hockey Asia Cup 2022: भारताचा रोमहर्षक विजय, कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

इंडोनेशियाची राजधानी असणाऱ्या जकार्तामध्ये (Jakarta) सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या युवा हॉकी संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

दैनिक गोमन्तक

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या युवा हॉकी संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारत बुधवारी जपानविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताने 1-0 ने विजय मिळवला. राजकुमार पालने भारतासाठी सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्येच भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली, जी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राखली. दुसरीकडे, जपानच्या संघाने अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही. (India defeats Japan in Hockey Asia Cup 2022)

दरम्यान, भारतीय युवा हॉकी (Hockey) संघाने दक्षिण कोरियाविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात शानदार प्रदर्शन केले. परंतु मंगळवारी सामना 4-4 असा बरोबरीत संपल्याने संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला. यानंतर त्यांनी कांस्यपदकासाठी जपानशी दोन हात केले. सुपर फोर टप्प्यात, भारत, मलेशिया (Malaysia) आणि कोरियाने प्रत्येकी पाच गुणांवर आपली मोहीम संपवली परंतु बिरेंदर लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गोल फरकाने तिसरे स्थान मिळवले.

राजकुमार पालने सामन्यातील एकमेव गोल केला

दक्षिण कोरियासोबत (South Korea) 4-4 अशा बरोबरीनंतर राजकुमार पालने सातव्या मिनिटाला मैदानी गोल करुन गतविजेत्या भारतासाठी गोल फरकाच्या आधारे अंतिम फेरीत स्थान गमावले. यानंतर भारतीय बचावफळीने चपळाई दाखवत जपानला एकही गोल करु दिला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT