Hockey Team India
Hockey Team India Dainik Gomantak
क्रीडा

Hockey World Cup: हार्दिक-अमितच्या जोरावर टीम इंडियाची विजयी सुरुवात, स्पेनचा उडवला धुव्वा

दैनिक गोमन्तक

India vs Spain Hockey World Cup 2023 Match: FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023 गट D चा सामना भारत आणि स्पेन यांच्यात राउरकेला येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दणदणीत विजय नोंदवला. भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला आणि यजमानांनी विजयासह स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताकडून अमित रोहिदासने गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने शानदार खेळ केला. यादरम्यान हार्दिक सिंगने भारतासाठी दुसरा गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली.

दरम्यान, भारतीय संघाने तिन्ही क्वार्टरमध्ये दमदार प्रदर्शन केले. तिसऱ्याच मिनिटाला भारतीय खेळाडू अभिषेकला 10 मिनिटे खेळातून बाहेर व्हावे लागले. त्याची टक्कर स्पॅनिश खेळाडूशी झाली. त्यामुळेच त्याला येलो कार्ड मिळाले. चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. यामुळे भारताने 2-0 असा विजय मिळवला.

तसेच, हाफ टाईमनंतर 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने (Team India) बचावात्मक पवित्रा घेतला. मात्र, लवकरच पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल करण्याची संधी मिळाली. हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) जवळपास तेच केले, परंतु गोलरक्षकाने चेंडू लाईनच्या आत जाऊ दिला नाही. त्यानंतर हरमनप्रीतला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली पण चेंडू वाईड गेला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने 14 व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला, मात्र यावेळी गोल होऊ शकला नाही.

दुसरीकडे, पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरची सुरुवात चांगली केली. दुसऱ्या क्वार्टरच्या 11व्या मिनिटाला हार्दिकने शानदार खेळ दाखवत चेंडू नेटपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आणि भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये स्पेनला गोल करण्याच्या संधी होती, परंतु भारतीय गोलरक्षक आणि बचाव पक्षाने ते होऊ दिले नाही. हाफ टाईमपर्यंत भारताला (India) 3 पेनल्टी कॉर्नर मिळाले, तर स्पेनला एक पीसी मिळाला.

भारतासाठी 200 वा गोल

अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यावर भारताने हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात 200 गोल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT