rohit and shubman gill Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: रोहित-शुभमन जोडी हिट! भारताचा नेपाळविरुद्ध दणदणीत विजय

Asia Cup 2023: आशिया कप 2023 मध्ये भारताने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

Asia Cup 2023: आशिया कप 2023 मध्ये भारताने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला.

भारताला 23 षटकांत 145 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 21.1 षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. रोहितने 59 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या.

शुभमन गिलने 62 चेंडूत 67 धावा काढल्या, यामध्ये त्याने 8 चौकार आणि एक षटकार मारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि नेपाळ पहिल्यांदाच आमने-सामने आले होते.

दरम्यान, नेपाळचा (Nepal) पराभव करुन भारत सुपर-4 साठी पात्र झाला आहे. आता सुपर-4 टप्प्यातील भारताचा पहिला सामना रविवारी 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याचा थरार पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

दुसरीकडे, पल्लेकल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नेपाळचा (DLS) 10 गडी राखून पराभव केला.

फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियासाठी 74 धावांची तूफानी खेळी खेळली, तर युवा सलामीवीर शुभमन गिलनेही 67 धावांची खेळी खेळली.

दुसरीकडे, भारताकडून (India) रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भारत आणि नेपाळ यांच्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. भारताचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी नेपाळला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 238 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा शानदार सामना होणार आहे

नेपाळविरुद्धच्या भारताच्या विजयामुळे 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार हे निश्चित झाले आहे.

तत्पूर्वी, सलामीवीर आसिफ शेखचे अर्धशतक आणि सोमपाल कामीच्या शानदार खेळीच्या बळावर नेपाळने या सामन्यात भारताविरुद्ध 48.2 षटकांत 230 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली.

नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर आसिफ शेख (97 चेंडूत 58 धावा) आणि कुशल भुर्तेल (25 चेंडूत 38 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावा काढल्या. खालच्या फळीत सोमपालने 56 चेंडूत 48 धावांची उपयुक्त खेळी केली.

रवींद्र जडेजाने 40 धावांत तीन बळी घेतले

भारताकडून रवींद्र जडेजाने 40 धावांत तीन बळी घेतले, मात्र दुसरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (10 षटकांत 34 धावा) यश मिळाले नाही.

वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराजने 61 धावांत तीन तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सामन्याच्या पहिल्या सात चेंडूंवर नेपाळच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची भारताला संधी होती, मात्र शमीच्या डावातील पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने भुर्तेलचा झेल सोडला, तर सिराजच्या पहिल्याच चेंडूवर असिफ झेलबाद झाला. मात्र. इशान किशननेही भुर्तेलला जीवदान दिले.

आसिफने 88 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले

आसिफने 88 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र त्यानंतर सिराजने त्याला शॉर्ट कव्हरवर झेल देण्यास भाग पाडले आणि यावेळी कोहलीनेही कोणतीही चूक केली नाही. आसिफने आपल्या खेळीत आठ चौकार मारले.

गुलशन झा (23) हा दुहेरी अंक गाठणारा तिसरा फलंदाज ठरला. सिराजने त्याला किशनकरवी झेलबाद केले. नेपाळने 37.5 षटकात 6 बाद 178 धावा केल्या असताना पावसामुळे खेळ तासभर थांबवण्यात आला.

दीपेंद्र सिंग आयरे (29) आणि सोमपाल यांनी खेळाच्या सुरुवातीला अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. एरीला एलबीडब्ल्यू आऊट करुन हार्दिकने ही भागीदारी तोडली. नेपाळने 44 व्या षटकात 200 धावांचा पल्ला गाठला.

यानंतर सोमपालने आक्रमक फलंदाजी करत हार्दिक आणि सिराजला षटकार ठोकले, मात्र शमीने त्याला आपले अर्धशतक पूर्ण करु दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT