विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 391 धावांचे लक्ष्य दिले. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची मोठी दमछाक झाली. भारताने श्रीलंकेवर 317 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. श्रीलंका संघातील एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
भारताने श्रीलंकेविरोधतील मालिका 3-0 अशी जिंकली आहे.
यापूर्वी नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार रोहित आणि शुभमन यांनी आधी उत्तम सुरुवात करुन दिली. पण रोहित 46 धावा करुन बाद झाला.
कोहलीने गिलसोबत डाव सावरला, 97 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार ठोकत 116 धावा केल्या व तंबूत परतला.
त्यानंतर कोहलीने तुफान फटकेबाजी करत, 85 चेंडूत दमदार शतक पूर्ण केले. ज्यानंतरही त्यानं थांबायचं नाव घेतलं नाही अखेरच्या बॉलपर्यंत कोहली धावा ठोकत होता. त्याने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकार ठोकत नाबाद 166 धावा केल्या.
भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार गडी बाद केले तर, शामी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
दरम्यान, भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि आर्यलंड यांच्यात झालेल्या सामन्यात, 290 धावा राखून न्यूझीलंडने विजय नोंदवला होता. एक जुलै 2008 साली हा सामना झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.