Team India Dainik Gomantak
क्रीडा

Test Ranking: टीम इंडिया नंबर वन! WTC Final आधी कांगारुंच्या 15 महिन्यांच्या वर्चस्वाला 'धक्का'

भारतीय कसोटी संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे.

Pranali Kodre

Team India top ICC Men's Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीनुसार आता रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला या क्रमवारीत मागे टाकले आहे.

तब्बल 15 महिन्यांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावरून खाली घसरला आहे. आता पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वार्षिक कसोटी क्रमवारी अपडेटपूर्वी ऑस्ट्रेलिया 122 गुणांसह अव्वल क्रमांकावर होते, तर भारतीय संघ 119 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. पण आता वार्षिक क्रमवारी अपडेट करताना 2020 नंतर पूर्ण झालेल्या सर्व मालिकांचा विचार केला गेला आहे. यामध्ये मे 2022 पूर्वी झालेल्या मालिकांची 50 टक्के सरासरी आणि त्यानंतरच्या सर्व मालिकांची 100 टक्के सरासरी लक्षात घेण्यात आली आहे.

त्याचमुळे ऑस्ट्रेलियाने 2019-20 हंगामात मायदेशात पाकिस्तानविरुद्ध मिळवला २-० विजय आणि न्यूधीलंडवरुद्ध मिळवलेला 3-0 विजय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच २०२१-२२ हंगामात इंग्लंडविरुद्ध 4-0 ने मिळवलेल्या कसोटी मालिकेची 50 टक्केच सरासरी लक्षात घेतली जाणार असल्याने ऑस्ट्रेलियाचे गुण आता 116 झाले आहेत.

तसेच भारतीय संघाबद्दल सांगायचे झाल्यास 2019-20 मध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध 2-0 ने पराभूत व्हावे लागले होते. पण आता हा पराभव ग्राह्य धरला जाणार नसल्याने भारतीय संघाचे 2 गुण वाढले असून आता भारतीय संघाचे क्रमवारीत 121 गुण झाले आहेत.

दरम्यान, या क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ 114 गुणांसह इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर 104 गुणांसह दक्षिण आफ्रिका आणि पाचव्या क्रमांकावर 100 गुणांसह न्यूझीलंड आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया जूनमध्ये आमने-सामने

नुकतीच फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला होता. या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

आता 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर या दोन संघात कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

Goa Police Suspension: पैशांची मागणी, खुनाचा प्रयत्‍न! राज्यात दहा महिन्‍यांत 16 पोलिसांचे निलंबन! खाकी वर्दीवरील काळे डाग चर्चेत

Goa Census: जातनिहाय जनगणना होणार 2027 मध्ये! पुढील वर्षी घरांची गणना; 3 हजार प्रगणकांची नियुक्ती

Uguem: 'आमचा गाव बुडतोय, झाडं कोसळत आहेत'! जबाबदार कोण? उगवे परिसरात स्थानिकांना अवैध रेती व्यवसायाची झळ

SCROLL FOR NEXT