Virender Sehwag | West Indies Dainik Gomantak
क्रीडा

'फक्त टॅलेंट असून...', वेस्ट इंडिज World Cup 2023 मधून बाहेर गेल्यानंतर सेहवाग बरसला

Pranali Kodre

Virender Sehwag react on West Indies Exit from World Cup 2023: झिम्ब्बावेमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत शनिवारी (1 जुलै) वेस्ट इंडिज संघाला स्कॉटलंडने 7 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे वेस्ट इंडिजवर 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होणाऱ्या वर्ल्डकप 2023 च्या मुख्य स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली.

त्यामुळे सध्या क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही याबद्दल तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून त्याच्या मते काय चूका झाल्या हे सांगितले आहे.

दरम्यान, वनडे इतिहासातील पहिले दोन वर्ल्डकप जिंकणारा वेस्ट इंडिज संघ पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळताना दिसणार नाही.

वेस्ट इंडिज वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर सेहवागने ट्वीट केले. त्याने लिहिले की 'किती शरमेची गोष्ट आहे. वेस्ट इंडिज वर्ल्डकपसाठी पात्र ठरू शकले नाहीत. यातून हेच दिसते की फक्त प्रतिभा असून चालत नाही. राजकारणापासून मुक्त असणे, लक्ष केंद्रित करणे आणि चांगल्या मॅन मॅनेजमेंटचीही गरज आहे. आता यापेक्षा आणखी खाली जाऊ शकत नाही.'

याशिवाय माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मात्र आशा व्यक्त केली आहे की वेस्ट इंडिज यापुढे प्रगती करतील. त्याने म्हटले आहे की 'आय लव्ह वेस्ट इंडिज, आय लव्ह वेस्च इंडियन. माझा अजूनही विश्वास आहे की ते जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल बनू शकतात.'

वेस्ट इंडिज आत्तापर्यंत कधीही वनडे किंवा टी20 वर्ल्डकपला मुकले नव्हते, पण यंदा पहिल्यांदाच वर्ल्डकपची मुख्य स्पर्धा वेस्ट इंडिज संघाशिवाय खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 या दोन वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा क्वाईव्ह लॉयड यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती.

पण वेस्ट इंडिजला 2023 वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळवता आला नव्हता. त्यामुळे त्यांना क्वालिफायर खेळावे लागले. पण क्वालिफायरमध्येही त्यांना फार चांगली कामगिरी करता आली नाही.

शनिवारी स्कॉटलंडविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे आता सुपर सिक्समध्ये वेस्ट इंडिज जास्तीत जास्त केवळ 4 गुणच मिळवू शकतात. पण श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचे यापूर्वीच 6 गुण झालेले असल्याने वेस्ट इंडिजला बाहेर जावे लागले.

शनिवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकात सर्वबाद 181 धावा करता आल्या. त्यानंतर 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग स्कॉटलंडने  43.3 षटकात 3 बाद 185 धावा करत सहज पूर्ण केला आणि सामना जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT