Rahul Dravid Twitter/ @BCCI
क्रीडा

Rahul Dravid: द्रविड अन् सपोर्ट स्टाफला आयर्लंड दौऱ्यात मिळणार सुट्टी, 'या' कारणामुळे BCCI चा मोठा निर्णय?

India tour of Ireland: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर पाचच दिवसात आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार असून यापूर्वी बीसीसीआय सपोर्ट स्टाफबाबत मोठा निर्णय घेणार आहे.

Pranali Kodre

India Cricket Team Coach Rahul Dravid and Support Staff set to rest for Ireland series: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. सध्या भारताचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. 13 ऑगस्टला वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी महत्त्वाचा निर्णय बीसीसीआय घेण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यावर नवा सपोर्ट स्टाफ सदस्य भारतीय संघाबरोबर असेल.

सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. अद्याप भारताला कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी20 मालिकाही होणार आहे.

टी20 मालिका 13 ऑगस्ट रोजी संपेल, याबरोबर हा दौराही संपेल. त्यानंतर लगेचच भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी जायचे आहे. ही मालिका 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या मालिकेतील तिन्ही टी20 सामने डब्लिनच्या सीमेवरील मलाहाईड येथे होणार आहेत.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयर्लंडविरुद्धच्या या टी20 मालिकेसाठी द्रविडबरोबरच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. ऑगस्टच्या अखेरीस सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धा लक्षात घेता ही विश्रांती सपोर्ट स्टाफला दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे त्यांच्याऐवजी बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. तसेच एनसीएमधील सितांशू कोटक, ट्रॉय कूली आणि साईराज बहुतुले यांचाही सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्यात येऊ शकतो.

आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याच भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे. तसेच रिंकू सिंग, जितेश शर्मा, राहुल त्रिपाठी अशा खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा हा एकूण आयर्लंडचा चौथा दौरा असणार आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये एकमेव वनडे सामना आयर्लंडला खेळला होता. त्यानंतर 2018 आणि 2022 साली भारताने 2 सामन्यांच्या टी20 मालिका आयर्लंडला खेळल्या.

भारत विरुद्ध आयर्लंड टी20 मालिका वेळापत्रक (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार)

  • 18 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)

  • 20 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)

  • 23 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT