India Cricket Team celebrated ISRO Chandrayaan-3 Successful Mission Dainik Gomantak
क्रीडा

Chandrayaan 3: साता समुद्रापार डब्लिनमध्ये चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेचं टीम इंडियाकडून सेलिब्रेशन, पाहा Video

Team India Video: भारताच्या चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेचं भारतीय संघाने डब्लिनमध्ये सेलिब्रेशन केले आहे.

Pranali Kodre

India Cricket Team celebrated ISRO Chandrayaan-3 Successful Mission in Dublin ahead of 3rd T20I against Ireland:

भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावरही तिरंगा फडकावला आहे. भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाली असल्याने देशभरात आनंद पसरला आहे. तसेच देशभरात जल्लोष केला जात आहे. याचवेळी भारताचा टी20 क्रिकेट संघानेही आयर्लंडमध्ये चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेबद्दल सेलिब्रेशन केले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान सॉफ्ट लँडिंग झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिलाच देश बनला आहे. या यशाबद्दल इस्त्रोचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

दरम्यान सध्या भारताचा टी20 क्रिकेट संघ आयर्लंड दौऱ्यावर असून टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा सामना 23 ऑगस्टलाच डब्लिनमधील द व्हिलेज मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.

पण, त्याआधी संपूर्ण भारतीय संघाने चांद्रयान-3 च्या लँडिगचे थेट प्रक्षेपण एकत्र पाहिले आहे. तसेच ही मोहिम पूर्ण झाल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखील भारतीय संघानेही टाळ्या वाजवत सेलिब्रेशन केले.

या सेलिब्रेशनचा व्हिडिओही आणि फोटोही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही इस्त्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेचे अभिनंदन केले आहे.

भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्माने ट्वीट करत लिहिले की 'भारत - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश. आपल्या सर्वांसाठी अभिनाचा क्षण. इस्त्रोचे त्यांच्या सर्व मेहनतीसाठी अभिनंदन.'

विराट कोहलीने अभिनंदन करताना लिहिले की 'चांद्रयान-३च्या टीमचे अभिनंतन. तुम्ही संपूर्ण देशाला गौरवान्वित केले आहे.'

याशिवाय देखील शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, इशान किशन अशा अनेक खेळाडूंनीही चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेचे कौतुक केले आहे.

भारत चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग करणारा चौथा देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिका आणि रशियाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले होते. पण दक्षिण ध्रुवावर पोहचणारा मात्र, भारत पहिलाच देश ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT