Shaheen Shah Afridi Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: सावधान! पाकिस्तानविरुद्ध सामना रद्द झाला, तरी भारतीय संघाला 'या' बाबतीत रहावे लागणार सतर्क

Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाला असला, तरी भारतीय संघाला एका प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे.

Pranali Kodre

India Cricket Team batsmen Struggle against Left Arm Fast Bowler:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना शनिवारी झाला. पण कँडीमध्ये झालेला हा सामना निकाल न लागतच रद्द झाला. पावसाचा व्यत्यय आल्याने दुसऱ्या डावाला सुरुवात होऊ शकली नाही.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर संपला. त्यानंतर पावसाचा जोर वाढला, त्यामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना रद्द करावा लागला.

दरम्यान असे असले तरी या सामन्यानंतर तरी भारतीय संघाला एका प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे. तो प्रश्न म्हणजे डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा कसा?

या सामन्यात भारताच्या सर्व 10 विकेट्स पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यातील शाहिन हा डावखुरा गोलंदाज आहे, तर रौफ आणि नसीम उजव्या हाताने गोलंदाजी करतात.

दरम्यान, भारताला सुरुवातीला मोठे धक्के दिले ते शाहिन आफ्रिदीने, जो डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. खरंतर भारतीय संघातील फलंदाज गेल्या अनेक अनेक दिवसांपासून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध तोडगा शोधत आहेत.

शाहिनने सुरुवातीला रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना त्रिफळाचीत केले. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांच्याही विकेट्स घेतल्या. दरम्यान, त्याने रोहित आणि विराट यांनाच सुरुवातीला बाद केल्याने भारतीय संघ 27 धावा 2 विकेट्स अशा स्थितीत आला होता.

त्यामुळे विचार करायचा झाल्यास सुरुवातीला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा सामना कसा करायचा याचा विचार भारतीय संघातील वरच्या फळीतील खेळाडूंना आणि प्रशिक्षकांनाही करावा लागणार आहे. कारण यापूर्वीही ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क अशा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत.

एकूणच आकडेवारी पाहायची झाली, तर 1 जानेवारी 2019 पासून उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या ९१ गोलंदाजांनी मिळून 80 वनडेत 295 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 22 डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी 67 सामन्यात 55 विकेट्स घेतल्यात.

त्याचबरोबर उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या 76 गोलंदाजांनी 80 सामन्यांत 74 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 17 डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी 47 सामन्यांत 72 विकेट्स घेतल्या आहेत.

ही आकडेवारी पाहाता लक्षात येते की भारतासाठी डावखुरे वेगवान गोलंदाज भारतीय संघाविरुद्ध हुकमी एक्के ठरत आहेत. अशात आगामी महत्त्वाच्या स्पर्धा लक्षात घेता, त्यावर काम भारतीय संघाला करावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT