Rohit Sharma X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, 5th Test: टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या दिवशी उतरला नाही मैदानात, BCCI ने दिलं स्पष्टीकरण

Rohit Sharma suffer stiff back: इंग्लंडविरुद्ध धरमशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात न उतरण्यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma not taken field on Day 3 of Dharamsala Test against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना धरमशाला येथे होत आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (9 मार्च) पहिल्या तासात संपला. भारताने पहिल्या डावात 124.1 षटकात सर्वबाद 477 धावा करत 259 धावांची आघाडी घेतली.

दरम्यान, त्यानंतर तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला नाही. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रोहितला पाठीत वेदना असल्याने तो तिसऱ्या दिवशी मैदानात उतरलेला नाही. दरम्यान, त्याच्याऐवजी नेतृत्वाची जबाबदारी उपकर्णधार जसप्रीत बुमराह सांभाळत आहे.

या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 120 षटकापासून आणि 8 बाद 473 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. पण सुरुवातीलाच जेम्स अँडरसनने 124 व्या षटकात कुलदीप यादवला 30 धावांवर जेम्स अँडरसनने यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातून झेलबाद केले.

त्यानंतर पुढच्याच षटकात बाशीरने जसप्रीत बुमराहला 20 धावांवर बाद केले. यासह भारताचा पहिला डाव संपला.

दरम्यान, पहिल्या डावात भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. त्याने शुभमन गिलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 271 धावांची भागीदारीही केली. गिलनेही रोहितबरोबर खेळताना शतक केले.

रोहितने 162 चेंडूत 103 धावांची खेळी केली. तसेच गिलने 150 चेंडूत 110 धावांची खेळी केली. याशिवाय सर्फराज खानने 56 धावांची खेळी केली, तसेच देवदत्त पडिक्कलने 65 धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून या डावात शोएब बशीरने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्सने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 57.4 षटकात सर्वबाद 218 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT