Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

Harmanpreet Kaur: निराशा तर येणारच! ऐन मोक्याला रनआऊट झालेल्या हरमनचा राग अनावर, बॅट फेकतानाचा Video Viral

Pranali Kodre

Harmanpreet Kaur Run Out: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात गुरुवारी महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी अवघ्या 5 धावांनीं विजय मिळवत सलग सातव्यांदा अंतिम फेरी गाठली.

दरम्यान, भारतीय महिलांचे आव्हान मात्र या पराभवामुळे संपुष्टात आले. या सामन्याला भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटने कलाटणी मिळाली होती. ऐन मोक्याच्या क्षणी तिची विकेट गेल्याने ती प्रचंड चिडलीही होती.

या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने बेथ मुनी (54), मेग लेनिंग (49*) आणि ऍश्ले गार्डनर (31) यांनी केलेल्या आक्रमणामुळे भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 28 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या.

पण त्यानंतर जेमिमाह रोड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरने भारताचा डाव सांभाळलाच नाही, तर भारताच्या विजयाच्या आशाही जिवंत केल्या. मात्र, 69 धावांची भागीदारी झाली असताना जेमिमाह 43 धावांवर बाद झाली. पण त्यानंतरही हरमनप्रीतने चांगला खेळ करत तिचे अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर ती दुर्दैवीरित्या बाद झाली.

झाले असे की ऋचा घोषबरोबर फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात दुहेरी धावा घेण्याचा तिने प्रयत्न केला. पण दुसरी धाव पूर्ण करत असताना क्रिजच्या काही अंतरावर असतानाच तिची बॅट अडकली आणि ती क्रिजमध्ये वेळेत पोहचू शकली नाही. तिने दुसरी धाव पूर्ण करण्याच्या आतच ऍश्ले गार्डनरच्या थ्रोवर यष्टीरक्षक एलिसा हेलीने तिला 52 धावांवर धावबाद केले होते.

त्यामुळे तिला भारताला विजयासाठी 32 चेंडूत केवळ 40 धावांची गरज असताना माघारी परतावे लागले. ती मैदानावर स्थिरावली होती आणि चांगल्या लयीतही होती. अशा परिस्थितीत मोक्याच्या क्षणी धावबाद झाल्याने ती प्रचंड नाराज दिसली. तिने बाद झाल्यानंतर तिची बॅटही खाली आपटली आणि दूरही फेकली. तिच्या चिडण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरलही होत आहे.

दरम्यान, तिची विकेट या सामन्याला मोठे वळण देणारी ठरली. कारण ती खेळपट्टीवर असेपर्यंत भारतासाठी सोपा वाटणारा विजय कठीण बनला. तिच्यानंतर भारताने ऋचा घोष (14), स्नेह राणा (11) आणि राधा यादव (0) यांच्या विकेट्सही गमवाल्या. अखेर दीप्ती शर्मा 20 धावांवर नाबाद राहिली. पण तरी भारताला विजयासाठी केवळ 6 धावा कमी पडल्या. भारतीय संघ 20 षटकात 8 बाद 167 धावाच करू शकला.

या सामन्यानंतर हरमनप्रीत भावूकही झाली होती. तिला अश्रू रोखणेही कठीण झाले होते. तसेच तिने तिच्या विकेटबद्दल बोलताना असेही म्हटले की यापेक्षा अधिक दुर्दैवी काही नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT