Team India Dainik Gomantak
क्रीडा

Women's Junior Hockey Asia Cup: भारताच्या पोरींनी रचला इतिहास! पहिल्यांदाच उंचावला आशिया चषक

Women's Junior Hockey Asia Cup: भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. या संघाने ज्युनियर महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

Manish Jadhav

Women's Junior Hockey Asia Cup: भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. या संघाने ज्युनियर महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेवर नाव कोरले आहे.

अंतिम फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला.

दक्षिण कोरियाने सर्वाधिक 4 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा 2021 मध्येच होणार होती, पण कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली.

दरम्यान, पहिल्या क्वार्टरमध्ये बरोबरीत राहिल्यानंतर भारताने 22 व्या मिनिटाला अनुच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलद्वारे आघाडी घेतली. जपानविरुद्धच्या उपांत्य फेरीतील निराशा मागे टाकत, अनुने गोलरक्षकाच्या डावीकडून गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र, पार्क सेओ येऑनने केलेल्या गोलमुळे तीन मिनिटांनी दक्षिण कोरियाने 1-1 अशी आघाडी घेतली. 41व्या मिनिटाला दक्षिण कोरियाच्या (South Korea) गोलकीपरच्या उजव्या बाजूने डागलेला गोल निर्णायक ठरला. नीलमने भारताला 2-1 ने आघाडीवर पोहोचवले.

त्यानंतर, अखेरच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आपली आघाडी मजबूत ठेवत विजयाची नोंद केली. दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नरच्या रुपात गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही.

यापूर्वी, महिला ज्युनियर आशिया कपमध्ये भारताची (India) सर्वोत्तम कामगिरी 2012 मध्ये होती, जेव्हा संघ बँकॉकमध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, चीनकडून 2-5 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT