Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty | Badminton X/bai_media
क्रीडा

French Open 2024: सात्विक-चिरागचा पॅरिसमध्येही डंका! अवघ्या 37 मिनिटात दुसऱ्यांदा कोरलं विजतेपदावर नाव

Satwik-Chirag Badminton: भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे.

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty clinched French Open title for second time

भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने फ्रेंच ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. पॅरिसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी रविवारी तैवानच्या ली झे-हुई आणि यांग पो हुआन या जोडीला पराभूत केले.

दरम्यान, सात्विक आणि चिराग यांचे हे 2024 मधील पहिले विजेतेपद आहे. यावर्षी त्यांनी इंडिया ओपन आणि मलेशिया ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवले होते.

तसेच फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील त्यांचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2022 साली देखील त्यांनी या स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच 2019 मध्ये सात्विक आणि चिराग यांच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.

दरम्यान रविवारी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग यांच्या जोडीने ली आणि यांग जोडीला अंतिम सामन्यात अवघ्या ३७ मिनिटात पराभूत केले. भारतीय जोडीने तैवानच्या या जोडीला 21-11, 21-17 अशा दोनच सरळ गेममध्ये पराभूत केले.

पहिल्या गेममध्ये तर त्यांनी पूर्ण वर्चस्व ठेवले होते. परंतु दुसऱ्या सेटमध्ये ली आणि यांगने थोडा प्रतिकार केला. परंतु चिराग आणि सात्विक यांनी त्यांना वरचढ होऊ दिले नाही.

सात्विक आणि चिराग यांनी फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेत उपांत्य फेरीत कोरियाच्या कँग मिन ह्युक आणि सेओ सेउंग जे या जोडीचा 21-13,21-16 अशा फरकाने अवघ्या 40 मिनिटात पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT