India Australia Test Series 2027 Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AUS: क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची अपडेट! भारत-ऑस्ट्रेलिया मालिका रंगणार; काय आहेत तारखा? जाणून घ्या..

India Australia Test Series 2027: क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून रविवारी ऑगस्ट (२०२६) ते ऑगस्ट (२०२७) या वर्षभरातील कसोटी मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

India vs Australia Test Series Dates : क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून रविवारी ऑगस्ट (२०२६) ते ऑगस्ट (२०२७) या वर्षभरातील कसोटी मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या वर्षभरात तब्बल २० कसोटी सामने खेळणार आहे.

यामध्ये भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांचा समावेश आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील कसोटी मालिका २०२७ मध्ये जानेवारी - मार्च या कालावधीत पार पडणार असून, दोन देशांत पाच कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा घरचा मोसम २०२६ मध्ये ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया-बांगलादेश यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ डिसेंबर (२०२६) ते मार्च (२०२७) यादरम्यान १० कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ पुढील वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडशी एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. दोन देशांमधील कसोटी क्रिकेटला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

अखेरचा दौरा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आले की, पॅट कमिंस, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड व नॅथन लायन हे खेळाडू भारताचा दौरा करतील. हा त्यांचा अखेरचा भारत दौरा असणार आहे. त्यांना अद्याप भारतामध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारतामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकांचे वेळापत्रक

ऑगस्ट : दोन कसोटी वि. बांगलादेश (मायदेशात)

ऑक्टोबर : तीन कसोटी वि. दक्षिण आफ्रिका (परदेशात)

डिसेंबर-जानेवारी : चार कसोटी वि. न्यूझीलंड (मायदेशात)

जानेवारी-मार्च : पाच कसोटी वि. भारत (परदेशात)

११ ते १५ मार्च : एकमेव कसोटी वि. इंग्लंड (मायदेशात)

जून : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा लढत (अंतिम फेरीत पोहोचल्यास, लंडन)

जून-ऑगस्ट : पाच कसोटी वि. इंग्लंड (परदेशात)

अंतिम फेरीत पोहोचल्यास कसोटीत वाढ

जागतिक कसोटी अजिंक्यपद लढत पुढल्या वर्षी जून महिन्यात पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केल्यास आगामी मोसमात त्यांच्या कसोटी संख्येत वाढ होईल. २० ऐवजी २१ कसोटी सामने त्यांचा संघ खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT