India A team Dainik Gomantak
क्रीडा

IND A vs BAN A: भारताने बांगलादेशला 112 धावांत गुंडाळले; सलामीवीरांचीही नाबाद अर्धशतके

भारत अ विरुद्ध बांगलादेश अ संघात अनधिकृत कसोटी मालिकेला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.

Pranali Kodre

IND A vs BAN A: भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात बांगलादेश दौरा करायचा आहे. या दौऱ्यात वनडे आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण त्याआधी 29 नोव्हेंबरपासून भारतीय अ संघाचा बांगलादेश दौरा सुरू झाला आहे.

भारत अ आणि बांगलादेश अ संघात दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळली जात असून पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे. पहिल्याच दिवशी भारताची गोलंदाजी चमकली. त्यातही सौरभ कुमार आणि नवदीप सैनीने शानदार गोलंदाजी केली.

शेख कमाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात भारताचा (Team India A) कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने हा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशला पहिल्या डावात 45 षटकातच 112 धावांवर रोखले.

भारताकडून सौरभ कुमारने 8 षटकातच 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त नवदीप सैनीने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमारला 2 आणि अतित शेठलाही एक विकेट मिळाली.

बांगलादेशकडून मोसाद्देक होसेन सायकोटने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव केवळ 112 धावांत उरकला.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून सलामीला कर्णधार अभिमन्यूसह युवा यशस्वी जयस्वाल सलामी देण्यासाठी आले. त्यांनी सलामीला नाबाद शतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. पहिल्या दिवसाखेर दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली होती. तसेच या दोघांनाही बाद करण्यात बांगलादेशला पहिल्या दिवशी यश मिळाले नाही.

पहिल्या दिवसाखेर भारताने 36 षटकात बिनबाद 120 धावा केल्या. भारताकडून अभिमन्यू 111 चेंडूत 53 धावांवर नाबाद आहे, तर जयस्वाल 106 चेंडूत 61 धावांवर नाबाद आहे. तसेच भारताने 8 धावांनी आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT