Independence Day: देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय संघाने झिम्बाब्वेमध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला. भारतीय संघ सध्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या संघासोबत कर्णधार केएल राहुल आणि शिखर धवनसारखे दिग्गज खेळाडू आहेत.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताला 18 ऑगस्टला पहिला वनडे सामना खेळायचा आहे. यातच सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय संघाने (Team India) झिम्बाब्वेची (Zimbabwe) राजधानी हरारे येथे पूर्ण उत्साहात तिरंगा फडकवला.
दुसरीकडे, बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये टीमने त्यांच्या हॉटेलबाहेर तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीतासह स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. यामध्ये खेळाडूंसह भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफही सहभागी झाला होता. यावेळी कॅप्टन राहुल सावध मुद्रेत उभा होता. त्याचवेळी धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओही पोस्ट केला. त्याने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 'जय हिंद'!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.