Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराट परतला घरी; बायो बबलसह तिसऱ्या T20 ला बाय-बाय

तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळण्या आधीच विराट घेणार 10 दिवसांचा ब्रेक

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) कोलकाता येथे विराट कोहलीला (Virat Kohli) बायो-बबल मधून ब्रेक दिला आहे. परिणामी भारताचा माजी कर्णधार दहा दिवस गायब होणार आहे. उद्या वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळला जाणार आहे परंतु त्या आधीच विराट 10 दिवस विश्रांती घेण्यासाठी घराकडे रवाना झाला आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात कोहलीने 41 चेंडूत 52 धावा केल्या आहेत. (Ind vs WI: Virat Kohli to miss third T20I as he leaves bio bubble)

सात वर्ष संघाचे नेतृत्व केल्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये कोहली भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला. कोहली हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनीकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि 58.82 च्या विजयाच्या टक्केवारीने 40 विजय मिळवले आहेत.

कसोटी कर्णधार म्हणून, त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला मालिका विजय आपल्या नावे नोंदवला आहे. भारताने 22 वर्षांनंतर एमराल्ड बेटावर नोंदवलेला हा विजय होता. कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 31 पैकी 24 कसोटी जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाने दुसरी कसोटी मालिका जिंकली आहे. आज शनिवारी सकाळीच कोहली आपल्या घरी जाण्यासाठी निघला आहे. क्रिकेटच्या तिन्ही मालिकेत संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी बीसीसीआयच्या क्रिकेट पॉलिसीनुसार, विराट कोहलीला ब्रेक दिला आहे. वर्कलोड आणि मानसिक आरोग्यासाठी खेळाडूंना बायोबबलमधून ब्रेक देण्याची तरतूद असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT