IND vs WI Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: 'या' स्टार खेळाडूंशिवाय टीम इंडिया खेळणार वनडे

संघाचा उपकर्णधार केएल राहुलही पहिला वनडे खेळणार नाही.

दैनिक गोमन्तक

6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे, याआधी टीम इंडियाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सीनियर सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan), राखीव सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि मधला फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना कोरोनाची लागण झाली. या कारणामुळे तो पहिल्या वनडेत टीम इंडियाचा (Team India) भाग असणार नाही. याशिवाय संघाचा उपकर्णधार केएल राहुलही (KL Rahul) पहिला वनडे खेळणार नाही.

केएल राहुल बहिणीच्या लग्नामुळे तो 6 फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत धवन आणि राहुल दोघेही संघाचा भाग नसताना कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) कोण ओपनिंग करणार, या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

6 फेब्रुवारीला केएल राहुल अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडिया सामील होणार आहे. मात्र, आधी त्यांना तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. यानंतर तो दुसऱ्या वनडेत मैदानावर दिसून येणार आहे.

बुधवारी नियमित आरटी-पीसीआर चाचणीमध्ये टीम इंडियाचे एकूण सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत. यात शिखर धवन, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी यांच्या भूमिका आहेत. यात तीन सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत, हे सर्वजण सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. भारतासाठी 19 कसोटी सामन्यांमध्ये 1400 हून अधिक धावा करणाऱ्या मयंक अग्रवालने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तो आतापर्यंत भारतासाठी पाच वनडे मॅच खेळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT