Axar patel Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: वेस्ट इंडिज विरूध्द मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी

अक्षर पटेलने षटकार मारून सामना जिंकला.

दैनिक गोमन्तक

BCCI: टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी भेद्य आघाडी घेतली आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या हा सामना भारताने जिंकला. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली की, वेस्ट इंडिजचा संघ पाहतच राहिला आणि भारताने हरलेला सामना जिंकला.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने अवघ्या 35 चेंडूत 64 धावा केल्या. यामध्ये त्याच्या नावावर 3 चौकार, 5 षटकारांचा समावेश आहे. भारताला शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती, इथे पहिले दोन रन एक-एक आशे आले आणि नंतर अक्षर पटेलने षटकार मारून सामना जिंकला.

अक्षर पटेलच्या फटकेदार खेळी मुळे शेवटच्या 10 षटकात भारताला विजयासाठी 100 धावांची गरज होती, ती टीम इंडियाने गाठली.

टीम इंडियाने शेवटच्या 10 षटकात 100 धावा केल्या आणि सामना जिंकला. शेवटच्या 10 षटकांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी पाठलाग केला.

धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे, ज्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या 10 षटकात 109 धावा देऊन विजय मिळवला. आता या यादीत भारताचे नावही सामील झाले आहे. भारताने याआधी 2015 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या 10 षटकांत 91 धावा करून विक्रम केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT