Axar Patel Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 4th T20I: अक्षर पटेलच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद, T20 मध्ये पहिल्यांदाच केले 'हे' काम

WI vs IND, 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली.

Manish Jadhav

WI vs IND, 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. यादरम्यान टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

खरे तर, या सामन्यात वेस्ट इंडिजकडून काईल मेयर्स आणि ब्रँडन किंग सलामीला आले होते. त्याचवेळी, कर्णधार हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात अक्षर पटेलला गोलंदाजीसाठी बोलावले. या षटकात अक्षरच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला.

अक्षरच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम झाला

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच षटकात अक्षर पटेलने 14 धावा दिल्या. यासह, तो T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टीम इंडियाचा (Team India) स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारही या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने दोनदा पहिल्या षटकात 14 धावा दिल्या आहेत.

या सामन्यात अक्षर गोलंदाजीमध्ये चमकला नाही. त्याने या सामन्यात 4 षटकात 39 धावा देत केवळ एकच विकेट मिळवली. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला 179 धावांचे लक्ष्य दिले आहे.

आतापर्यंतचा सामना कसा होता

भारत (India) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा T20 सामना अमेरिकेतील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 8 गडी गमावून 178 धावा केल्या. टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकावाच लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT