West Indies vs India, 4th T20I, Playing XI: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात विजय मिळवलेली भारताची प्लेइंग इलेव्हनच चौथ्या सामन्यासाठी कायम करण्यात आली आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले असून जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय शाय होपलाही जॉन्सन चार्ल्सच्या जागेवर आणि ओडियन स्मिथला रोस्टन चेसच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
भारत - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज - ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाय होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय
दरम्यान, पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेत वेस्ट इंडिज सध्या तीन सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. पहिला सामना भारताने केवळ 4 धावांनी गमावला होता, तर दुसरा सामना भारताला 2 विकेट्सने गमवावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजने 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण तिसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत आव्हान कायम ठेवले.
तथापि आता चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला, तर वेस्ट इंडिज ही मालिकाही खिशात घालेल. तसेच, भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 2017 नंतर पहिल्यांदाच टी20 मालिका गमावेल. मात्र, जर भारताने चौथा सामना जिंकला, तर भारत मालिकेत बरोबरी साधेल, त्यामुळे 13 ऑगस्टला होणारा अखेरचा सामना निर्णायक ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.