Nicholas Pooran Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd T20I: निकोलस पूरनने दिले पराभवाचे 'चुरण'! वेस्ट इंडिजचा भारतावर दोन विकेट्सने रोमहर्षक विजय

WI vs IND, 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाची लाजिरवाणी कामगिरी सुरुच आहे.

Manish Jadhav

WI vs IND, 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाची लाजिरवाणी कामगिरी सुरुच आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध गयाना येथे खेळेल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 2 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला.

यासह वेस्ट इंडिजने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 विकेट्सच्या मोबदल्यात 152 धावा केल्या, त्यानंतर इंडिज संघाने 8 विकेट्स गमावून 155 धावा केल्या आणि 7 चेंडू राखून लक्ष्य गाठले.

दरम्यान, 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने 32 धावांत पहिल्या 3 विकेट गमावल्या. ब्रेंडन किंग (0), जॉन्सन चार्ल्स (2) आणि काइल मेयर्स (15) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले.

मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पूरनने संघाला सावरले. त्याने आपल्या 67 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार रोव्हमन पॉवेलने 21 तर शिमरॉन हेटमायरने 22 धावा केल्या.

मजबूत स्थितीत दिसत असलेला वेस्ट इंडिजचा संघ अखेरीस 126 आणि 129 या धावसंख्येदरम्यान 4 विकेट गमावून अडचणीत सापडला. अकील हुसेन (नाबाद 16) आणि अल्झारी जोसेफ (नाबाद 10) यांनी संघाला विजय मिळवून दिला असला तरी.

कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 3 तर यजुवेंद्र चहलने 2 बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांना 1-1 विकेट मिळाली.

दुसरीकडे, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या.

भारताकडून दुसरा सामना खेळताना तिलक वर्माने सर्वाधिक 51 धावांची खेळी खेळली. तर वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ आणि रोमॅरियो शेपर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. संघाचा सलामीवीर शुभमन गिल 9 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादव धावबाद झाला. सूर्याला 3 चेंडूत एकच धाव करता आली.

दरम्यान, इशान किशन (Ishan Kishan) आणि तिलक वर्माने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते संथ गतीने धावा काढताना दिसले. इशान 23 चेंडूत 27 धावा करुन क्लीन बोल्ड झाला. तर वर्मा 16 व्या षटकात अकिल हुसेनचा बळी ठरला.

दुसरीकडे, संजू सॅमसन खराब शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने अवघ्या 7 धावा काढल्या. दरम्यान, तिलक वर्माने आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. 41 चेंडूत 51 धावा करुन तो बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT