WI vs IND, 2nd T20I: 'या' खेळाडूंच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणे दूरचे स्वप्न... टीम इंडियाचा फ्लॉप शो!

Team India: त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव झाला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Cricket Team Flop Show: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मालिका (IND vs WI) खेळत आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाने कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली, मात्र टी-20 मालिकेची सुरुवात पराभवाने झाली.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव झाला. दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांची झालेली ही अवस्था पाहून चाहत्यांची निराशा झाली आहे.

पुढील वर्षी T20 विश्वचषक...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. हार्दिकने याआधीही या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.

भारताला (India) पुढच्या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदावर टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरत आहे, ही चाहत्यांसाठी चिंतेची बाब ठरु शकते. भविष्यात हार्दिक टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळेल, असे मानले जात आहे.

Team India
WI vs IND, 2nd T20I: जयस्वालचे पदार्पण होणार? हा खेळाडू होऊ शकतो बाहेर; पाहा भारताची संभाव्य Playing XI

अशा प्रकारे विश्वचषक जिंकणे कठीण होईल

गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज पुन्हा फ्लॉप ठरले. संघाच्या 2 विकेट अवघ्या 18 धावांवर पडल्या. शुभमन गिल 7 आणि सूर्यकुमार यादव 1 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना संजू सॅमसनने 7 आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने 27 धावा काढल्या. या सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली.

तिलकने लाज राखली

दुसऱ्या टी-20 सामन्यात तिलक वर्माने टीम इंडियाची लाज राखली. गेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या या 20 वर्षीय खेळाडूने गयानामध्ये अर्धशतक झळकावले.

तिलकने 41 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 51 धावा केल्या. त्याने कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

Team India
WI vs IND, 1st T20: उत्साही चहल! बॅटिंगला पाठवायचं होतं मुकेशला पोहोचला युझी, कन्फ्यूजन झाल्यावर...

पहिल्या T20 मध्येही टीम इंडिया फ्लॉप

गेल्या सामन्यात भारतीय संघाला दीडशे धावांचे लक्ष्यही गाठता आले नव्हते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने 6 विकेट्सवर 149 धावा केल्या, त्यानंतर भारतीय संघ 9 विकेटवर 145 धावाच करु शकला.

पहिल्या सामन्यात शुभमन गिलने 31 आणि इशान किशनने 40 चेंडूत 40 धावा काढल्या. तर सूर्या म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. त्याने 21 चेंडूंत 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा काढल्या.

युवा खेळाडू तिलक वर्माने 22 चेंडूत 39 धावा काढल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले होते. कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 19 तर ​​संजू सॅमसनने 12 धावांचे योगदान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com