Dunith Wellalage  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: रोहित, कोहली अन् गिलला आऊट करणारा कोण आहे दुनिथ वेलालागे, श्रीलंकेच्या 'या' दिग्गजाशी केली जातेय तुलना

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा चौथा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे.

Manish Jadhav

Dunith Wellalage IND vs SL Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा चौथा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे.

टीम इंडियाने या सामन्यात दमदार सुरुवात केल्यानंतर, श्रीलंकेच्या एका गोलंदाजाने आपल्या करिष्माई गोलंदाजीने सर्वांना चकित केले. 20 वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने शानदार गोलंदाजी केली.

दुनिथने आपल्या 4 षटकांत टीम इंडियाच्या 3 विकेट काढल्या. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या स्टार फलंदाजांना दुनिथने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दुनिथने शुभमन गिल आणि रोहित शर्माला बोल्ड केले, त्यानंतर विराट कोहलीला दसून शनाकाकरवी झेलबाद केले.

रंगना हेराथनशी तुलना केली जाते आहे.

दरम्यान, दुनिथची तुलना श्रीलंकेचा (Sri Lanka) दिग्गज रंगना हेराथशी केली जात आहे. दुनिथ हा डाव्या हाताचा संथ ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे.

विशेष म्हणजे, दुनिथने आपल्या होम ग्राउंडवर करिष्माई गोलंदाजी केली. त्याचा जन्म 9 जानेवारी 2003 रोजी कोलंबो येथे झाला. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकलेल्या दुनिथने अफगाणिस्तानला आशिया कपमधून बाहेर पडण्यातही योगदान दिले.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 36 धावांत 2 बळी घेतले होते. त्याने श्रीलंका अंडर-19 आणि श्रीलंका A संघांसाठीही चमकदार कामगिरी केली आहे.

यासोबतच त्याने लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्सकडून चमकदार कामगिरी केली. तो श्रीलंकेतील स्थानिक कोल्ट्स क्रिकेट क्लबकडूनही खेळतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले

दुनिथने यापूर्वी कसोटी पदार्पण केले आहे. गतवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) गॉलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती. गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात त्याने 7 षटकांत 2 बळी घेतले होते.

दुनिथने याआधी 12 एकदिवसीय सामन्यात 13 बळी घेतले आहेत. तो कधीकधी चांगली फलंदाजीही करतो. त्याने प्रथम श्रेणीमध्ये 78 धावांची नाबाद खेळीही खेळली आहे.

विशेष म्हणजे, दुनिथचा वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT