Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023 Final: BCCI ची मोठी घोषणा, आशिया कप फायनलसाठी टीम इंडियात बदल

Asia Cup 2023 Final: आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात (रविवार) 17 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

Manish Jadhav

Washington Sundar replaces Axar Patel: आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात (रविवार) 17 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 03.00 वाजता सुरु होईल.

यातच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अचानक एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियात मोठा बदल केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी एका स्टार अष्टपैलू खेळाडूने भारतीय संघात प्रवेश केला आहे.

आशिया कप फायनलसाठी टीम इंडियामध्ये बदल झाला!

आशिया कप फायनलपूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) मोठा बदल करण्यात आला आहे. स्टार अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे.

अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी 23 वर्षीय सुंदर हा श्रीलंकेत पोहोचला आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचाही सुंदर भाग आहे.

बीसीसीआयने रात्री उशिरा एक मोठी घोषणा केली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, 'शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध भारताच्या सुपर फोर सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे अक्षर पटेल श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) आशिया कप फायनलमधून बाहेर गेला आहे.

निवड समितीने अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे.' हा अष्टपैलू खेळाडू कोलंबोला पोहोचला आणि संघात सामील झाला.

आशिया कप 2023 साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT