Virat Kohli & Anushka Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Century: बाबांचा आशीर्वाद मिळताच किंग कोहलीने ठोकले शतक, चाहते म्हणाले...

Virat Kohli Century: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 45 वे शतक आहे. ब्रेकनंतर कोहली पुनरागमन करत आहे. कोहलीच्या शतकाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

वृंदावनहून परतल्यानंतर कोहलीने शतक झळकावले. एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता रोहित शर्मा, केएल राहुल यांनाही बाबा नीम करौली यांच्या आश्रमात जायला आवडेल.

नशिबाने कोहलीला साथ दिली

महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 49 शतकांच्या विश्वविक्रमापासून तो आता फक्त चार शतके दूर आहे. कोहलीच्या नावावर आता 73 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 27 तर आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे.

दुसरीकडे, आपल्या खेळीबाबत विराट म्हणाला की, या सामन्यापूर्वी मला थोडा ब्रेक मिळाला आहे, काही सराव सत्रे झाली आहेत. बांगलादेश दौर्‍यानंतर मी मानसिकदृष्ट्या ताजेतवाने झालो आहे, जिथे दुसऱ्या सहामाहीत माझ्यासाठी नियोजनानुसार गोष्टी घडल्या नाहीत. मी स्पर्धेसाठी खूप उत्सुक होतो.'

चाहत्यांच्या प्रतिक्रीया

विराट कोहलीच्या शानदार शतकावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या या शतकाबद्दल सेलिब्रेशनही केलं जात आहे. विशेष म्हणजे, विराटच्या चाहत्यांनी ट्वीट करत टीम इंडियामधील दिग्गज क्रिकेटपटूंना सूचित केलं आहे. जाणून घेऊया त्यांनी ट्वीट करत काय म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: आजीबाईंचा भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धूमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'जुने खेळाडू मैदानात उतरले...'

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

SCROLL FOR NEXT