Virat Kohli Viral Video: किंग कोहली आऊट होताच भडकला, पॅव्हेलियनकडे परतत असताना...

Virat Kohli: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरला.
Virat Kohli Viral Video | IND Vs BAN Test Match
Virat Kohli Viral Video | IND Vs BAN Test Match Dainik Gomantak

Virat Kohli Viral Video, Dhaka Test: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरला. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात 22 चेंडूंचा सामना केला आणि केवळ एक रन काढली. मोमिनुल हकने अप्रतिम झेल घेतल्याने ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विराट आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत असताना त्याचा संयम सुटला.

विराट एक धाव काढून बाद झाला

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी विराटला मेहदी हसन मिराजने आऊट केले. दुसऱ्या डावात तो बाद झाला. डावाच्या 20 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर मेहदी हसनने त्याला मोमिनुल हककरवी झेलबाद केले. तो संघाचा चौथा विकेट म्हणून बाद झाला, ज्यामुळे टीम इंडियाची (Team India) धावसंख्या 4 विकेटवर 37 धावा झाली.

Virat Kohli Viral Video | IND Vs BAN Test Match
Virat Kohli: जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या 100 खेळाडूंमध्ये किंग कोहली, 'टॉपर'चा पगार ऐकून...

विराटला राग आला

आऊट झाल्यानंतर विराटला प्रतिस्पर्धी खेळाडूवर राग आला. तो पॅव्हेलियनकडे परतत असताना विरोधी संघातील खेळाडू त्याला काहीतरी बोलल्यासारखे वाटत होते. विराट रागाने परतला आणि त्याने विरोधी खेळाडूंकडे बोट दाखवले. तो त्या खेळाडूकडे बोट दाखवत असल्याचे दिसत होते. तो काहीतरी बोलला आणि मग पॅव्हेलियनकडे परतला. विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, बांगलादेशचा (Bangladesh) कर्णधार शकीब अल हसन आणि मैदानावरील पंचांनी त्याला समजावून सांगितले आणि तो काहीतरी बोलत पॅव्हेलियनकडे परतला.

Virat Kohli Viral Video | IND Vs BAN Test Match
किंग कोहली दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेला मुकणार, हार्दिक पांड्याचं पुनरागमन

दुसरीकडे, हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 145 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 4 विकेट गमावल्या. कर्णधार केएल राहुल 2, चेतेश्वर पुजारा 6, शुभमन गिल 7 आणि विराट कोहली 1 रन करुन परतले. तिसऱ्या दिवसापर्यंत भारताने 23 षटकांत 4 बाद 45 धावा केल्या आहेत. तर अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावा करुन खेळत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com