Chris Silverwood  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL Final: 'खूप प्रश्न विचारले जातील...', फायनलमधील दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य

Manish Jadhav

Chris Silverwood on Sri Lanka Defeat in Asia Cup Final: भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने 10 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो उलटला. मोहम्मद सिराजचे 6, हार्दिक पांड्याचे 3 विकेट आणि जसप्रीत बुमराहच्या 1 विकेटमुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकांत अवघ्या 50 धावांत गारद झाला.

दरम्यान, श्रीलंकेचे (Sri Lanka) 5 फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. तर आपल्या गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने अवघ्या 6.1 षटकांत विजय मिळवला. या पराभवानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड खूपच निराश दिसले.

खूप प्रश्न विचारले जातील

सिल्व्हरवुड म्हणाले- 'संघाची कामगिरी खूपच सुमार झाली. आम्ही ज्या पद्धतीने बाद झालो आणि गोलंदाजी केली ती खूपच निराशाजनक होती. याचा विचार करुन उद्या काही निर्णय घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. आम्ही कुठे चुकलो याचा नक्कीच विचार करु. आम्ही इतर कोचिंग स्टाफशीही यासंबंधी चर्चा करु. मला खात्री आहे की, खूप प्रश्न विचारले जातील.'

सिल्व्हरवुड पुढे म्हणाले- 'आज आम्ही हाय क्लास बॉलिंग अॅटकचा सामना केला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी शानदार गोलंदाजी केली. ते चांगल्या गतीने गोलंदाजी करतात, परंतु त्याचवेळी ही आमची कमतरता आहे.

आम्ही काही नवख्या गोलंदाजांसह फायनल खेळण्यासाठी उतरलो, त्यातील काहींनी चमकदार कामगिरी केली. सदीरा आणि पाथीराना यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT