Team India Dainik Gomantak
क्रीडा

Just Wow…टीम इंडियाच्या विजयावर केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटने जिंकली मनं, उपांत्य फेरीसाठी दिल्या शुभेच्छा

World Cup 2023: मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या विजयाबद्दल संघाचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले.

Manish Jadhav

Team India Semifinal ODI World Cup 2023: सो ब्यूटीफुल, सो एलीगेंट, जस्ट लाइक अ वाओ… हा डायलॉग गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक सोशल मीडिया यूजर्सच्या ओठावर आहे. गुरुवारी जेव्हा टीम इंडियाने श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय नोंदवला तेव्हा तो अ वाओ... मूव्हमेंट होता.

यासह टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. यातच, मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या विजयाबद्दल संघाचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले.

गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सो ब्यूटीफुल, सो एलीगेंट, जस्ट लाइक अ वाओ…' त्यांनी मोहम्मद शमी, विराट कोहली आणि शुभमन गिलचे फोटो शेअर केले आहेत. पियुष गोयल यांचे हे ट्विट क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनले आहे. टीम इंडियाच्या (Team India) या शानदार विजयाबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा ट्रेंड का व्हायरल होतोय

इंस्टाग्रामवर जस्मिन कौर नावाच्या महिलेने “जस्ट लुकिंग लाइक अ वाओ” या मीमची सुरुवात केली. वास्तविक, सलवार सूट विकण्याचा अनोखा मार्ग स्वीकारताना त्यांनी हा डॉयलॉग म्हटला होता. जो काही वेळातच व्हायरल झाला. यानंतर यावर मीम्स बनवले जाऊ लागले. दीपिका पदुकोण आणि यशराज मुखाते यांनीही त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ 358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 55 धावांवर गडगडला. अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना 302 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

टीम इंडियाचा विश्वचषकातील (World Cup) 7 सामन्यांमधला हा 7 वा विजय ठरला. टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरला आहे. भारतीय संघ 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Rashi Parivartan: 30 वर्षांनंतर होणार 'शनी' परिवर्तन! 'या' 3 राशींच्या नशिबाला लागणार ग्रहण; साडेसातीचा फेरा घेणार तुमच्या संयमाची परीक्षा

Goa Budget 2026: गोव्याचा 'बजेट डे' ठरला! 6 मार्चला मुख्यमंत्री सावंत मांडणार अर्थसंकल्प; सभापती गावकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

T20 World Cup: पाकिस्तान अन् श्रीलंकेचं 'पॅकअप' अटळ? भारतही रामभरोसे; 51 वर्षांचा इतिहास 2026 मध्ये बदलणार? पाहा सुपर-8 चं डेंजर झोन गणित

VIDEO: 'PM शाहबाज शरीफ सह 3.5 कोटी लोक मारले गेले असते...'; भारत-पाक युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा!

Mahalaxmi Rajyog: मनाचा राजा अन् ग्रहांचा सेनापती देणार अफाट संपत्ती! महालक्ष्मी राजयोगानं पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; घरामध्ये नांदणार सुख-समृद्धी

SCROLL FOR NEXT