Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: Rohit Sharma ने तोडला MS Dhoni चा 'हा' रेकॉर्ड

रोहित शर्माने भारतीय कर्णधार म्हणून एक खास विक्रम केला आहे.

दैनिक गोमन्तक

भारताने T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय नोंदवला आहे. या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. एका वर्षात सर्वाधिक T20 सामने जिंकणारा रोहित भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 2016 मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) यावर्षी आतापर्यंत 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर या बाबतीत धोनी दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2016 मध्ये 15 सामने जिंकले. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 फॉर्मेटमध्ये शतक झळकावणारा रोहित हा भारतीय खेळाडू आहे. भारताकडून केवळ दोन खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे.

विशेष म्हणजे, टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजयाची नोंद केली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 3 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला अडचणीत आणले. यानंतर आफ्रिकेचा संघ केवळ 106 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने 16.4 षटकांत सामना जिंकला. पण या सामन्यात रोहितला काही विशेष करता आले नाही. तो खाते न उघडताच बाद झाला. भारताकडून केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी नाबाद अर्धशतके झळकावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

Ganesh Chaturthi Best Status: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास 10 स्टेटस, Watch, Download, Share

Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

High Court: 'गाय केवळ पूजनीयच नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

SCROLL FOR NEXT