Rohit Sharma

 
क्रीडा

IND VS SA: टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅनची कसोटी मालिकेतून माघार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने रोहित शर्माच्या बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे. बीसीसीआयच्या (BCCI) म्हणण्यानुसार, रोहित शर्माला दुखापत झाली असून तो तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये फलंदाजी करताना रोहित शर्मा जखमी झाला होता. त्याच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग स्नायूंवर ताण आला आहे.

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माला कसोटी उपकर्णधार बनवण्यात आलं होतं, परंतु आता त्याच्या दुखापतीनंतर उपकर्णधार कोण असेल हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.

रोहित शर्माला दुखापत कशी झाली?

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीपूर्वी रोहित शर्माच्या हातालाही दुखापत झाली होती. रोहित शर्मा गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. सराव खेळपट्टी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीप्रमाणेच बनवण्यात आली होती जिथे थ्रो-डाउन स्पेशालिस्ट रघू रोहितला उसळत्या चेंडूंसह सराव करत होता. रघूचा एक चेंडू रोहित शर्माच्या हाताला लागला. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने त्याने सराव सुरूच ठेवला. पण यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगचे स्नायूही ओढले गेले. रोहित शर्माच्या बाहेर पडण्याचा अर्थ असा आहे की दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया सलामीला केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना मैदानात उतरवेल.

दरम्यान, रोहित शर्माचा बाहेर पडणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. रोहित शर्माने या वर्षात भारतासाठी सर्वाधिक 906 कसोटी धावा केल्या आहेत. रोहित शर्माने इंग्लंडमध्येही सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले होते. रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिकेत चांगला रेकॉर्ड नाही. रोहितने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत 4 कसोटी सामने खेळले असून त्याची फलंदाजीची सरासरी फक्त 15.37 आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी अर्धशतक करू शकला नाही. यावेळी रोहितला स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती पण दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेतूनच बाहेर पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT