Wasim Jr Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs PAK: पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का, वसीम ज्युनियर आशिया चषकातून बाहेर

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या सराव सत्रात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. त्याची टीमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तपासणी केली आणि दुबईतील एमआरआय स्कॅनद्वारे याची पुष्टी झाली.

दरम्यान, 28 ऑगस्ट रोजी भारताविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरला (Mohammad Wasim Jr) झालेली दुखापत ही पाकिस्तानसाठी (Pakistan) चांगली वेळ नाही. यापूर्वी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद वसीम ज्युनियरच्या जागी हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. इव्हेंट टेक्निकल कमिटीची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.

दुसरीकडे, वसीमने गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हापासून तो 11 T20 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 15.88 च्या सरासरीने आणि 8.10 च्या इकॉनॉमीने 17 बळी घेतले आहेत. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) घरच्या मालिकेतही वसीमने चमकदार कामगिरी केली होती. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या.

तसेच, आशिया कपमधून बाहेर पडणारा पाकिस्तानचा हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. याआधी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला संघात स्थान मिळाले आहे. हसनैन हारिस रौफ, शाहनवाज डहानी आणि नसीम शाह यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) मालिकेत आफ्रिदीला दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT