Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकिस्तानने एक दिवस आधीच केली प्लेइंग 11 ची घोषणा, टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी...

IND vs PAK Asia Cup 2023: आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाईल.

Manish Jadhav

IND vs PAK Asia Cup 2023: आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाईल. या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नेपाळविरुद्ध जी प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली होती तीच भारताविरुद्धही कायम ठेवली आहे.

शनिवार 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे होणार्‍या या मोठ्या सामन्याआधीच पाकिस्तानने आपल्या 11 खेळाडूंची घोषणा करुन सर्वांना चकित केले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी कर्णधार बाबर आझमच्या पत्रकार परिषदेनंतर आपल्या सोशल मीडियावर प्लेइंग इलेव्हनबाबत पोस्ट केली.

दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

त्या सामन्यात पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मधल्या फळीतील फलंदाज इफ्तिखार अहमद यांनी शानदार शतके झळकावली होती.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 342 धावा केल्या होत्या. त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि शादाब खान (Shadab Khan) यांनी मिळून नेपाळला केवळ 104 धावांत गुंडाळले.

दुसरीकडे, नेपाळवरील (Nepal) विजयानंतरही पाकिस्तानचे काही माजी दिग्गज संघात बदल करण्याची मागणी करत होते.

विशेषत: गेल्या काही महिन्यांत अयशस्वी ठरलेल्या आणि नेपाळविरुद्धही निष्प्रभ ठरलेल्या सलामीवीर फखर झमानच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.

याशिवाय, संघाच्या मधल्या फळीत आगा सलमानच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह आहे, ज्याला या फॉरमॅटचा फारसा अनुभव नाही. असे असतानाही पाकिस्तानने नेपाळवर विजय मिळवला.

परंतु त्याची खरी परीक्षा आता भारताविरुद्ध होणार असून पाकिस्तानचा निर्णय योग्य होता की अयोग्य हे शनिवारीच कळेल.

अजूनही बदलू शकते

मात्र, याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानी संघ सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकत नाही. नियमानुसार पाकिस्तानी संघ नाणेफेकीपूर्वी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. मात्र, पाकिस्तानी प्लेइंग इलेव्हन सेटल झाल्याचे दिसत असल्याने तसे होण्याची आशा फार कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT