India Vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

Legends League: टक्कर ! आशिया चषकापूर्वी भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने, कधी अन् कुठे...!

Legends League Cricket: क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने यावेत, अशी तमाम जगभरातील क्रिकेटप्रेमींची इच्छा असते.

दैनिक गोमन्तक

Legends League Cricket: क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने यावेत, अशी तमाम जगभरातील क्रिकेटप्रेमींची इच्छा असते. यंदा ही प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. आशिया चषकापूर्वीच प्रेक्षकांना पाकिस्तानी आणि भारतीय खेळाडू मैदानावर दोन-दोन हात करताना पाहायला मिळणार आहेत. हे सामने दोहा येथे होणार आहेत. वास्तविक, कतार क्रिकेट असोसिएशन 27 फेब्रुवारी 2023 ते 8 मार्च 2023 या कालावधीत कतारमध्ये लीजेंड्स लीग मास्टर्सच्या पुढील हंगामाचे आयोजन करेल.

दरम्यान, या क्रिकेट लीगमध्ये भारत, पाकिस्तान (Pakistan), ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजसह इतर अनेक देशांतील दिग्गज क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहेत. या लीगमध्ये खेळणाऱ्या प्रसिद्ध चेहऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, गौतम गंभीर, इरफान पठाण (Irfan Pathan), शाहिद आफ्रिदी, मिसबाह-उल-हक, शोएब अख्तर, मुथय्या मुरलीधरन, रॉबिन उथप्पा, एस श्रीशांत, ब्रेट ली, शेन वॉटसन, ख्रिस गेल आणि लेंडल सिमन्स आहेत.

8 सामने खेळवले जातील

या मेगा इव्हेंटमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. फिफा विश्वचषकाचे आयोजन केल्यानंतर कतार जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मोसमात लीगचे 8 सामने खेळवले जाणार आहेत. या लीगमध्ये भारत महाराज, आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स असे तीन संघ आहेत.

दुसरीकडे, या लीगबाबत भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पा म्हणाला की, 'मी या मोसमात खेळण्यासाठी उत्साहित आहे, मी माझ्या जुन्या सहकाऱ्यांसोबत खेळणार आहे.' रॉबिनने गेल्या सीझनमध्ये कॉमेंट्री केली होती. त्याच्याशिवाय अनुभवी गोलंदाज मुरलीधरनने सांगितले की, 'या लीगमध्ये खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' त्याच्याशिवाय पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी म्हणाला की, 'मी या स्पर्धात्मक हंगामाची वाट पाहत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT