Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: सामन्याआधी भारतीय खेळाडू पाकिस्तानसमोर गुडघे टेकून बसले, जाणून घ्या

चाहते या सामन्याला युद्धाचे स्वरुप देण्यामध्ये व्यस्त असताना मैदानावरील दोन्ही संघांनी जगाला एक विशेष संदेश दिला.

दैनिक गोमन्तक

टी -20 विश्वचषकात (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ एकमेकांसमोर आले. चाहते या सामन्यासाठी खूप आतुर होते. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात, तेव्हा चाहत्यांना हा महामुकाबला पाहण्याची संधी क्वचितच मिळते. चाहते या सामन्याला युद्धाचे स्वरुप देण्यामध्ये व्यस्त असताना मैदानावरील दोन्ही संघांनी जगाला एक विशेष संदेश दिला.

नाणेफेकानंतर, सामना सुरु होण्यापूर्वी, चाहत्यांना मैदानावर असे दृश्य पाहायला मिळाले जे आजपर्यंत कधीही घडले नव्हते. रोहित शर्मा आणि के.एल राहुल मैदानाच्या आत पाऊल टाकण्यापूर्वी जमिनीवर गुडघे टेकताना दिसले. त्याच्यासोबत डगआउटमध्ये, सध्याच्या टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू छातीवर हात ठेवून एका गुडघ्यावर बसलेले दिसले. दुसरीकडे, पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर उपस्थित होते आणि त्यांनीही त्यांच्या छातीवर हात ठेवले होते.

गुडघ्यांवर बसायचे हे कारण होते

खरं तर, भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी जगभरातील वर्णभेदाविरोधात सुरु असलेल्या ब्लॅक लाईव्ह मोमेंटला समर्थन देण्यासाठी केले. टीम इंडियाने याविषयी आधी माहिती दिली नव्हती. तथापि, मैदानावरील हे दृश्य प्रत्येक चाहत्याच्या हृदयाला स्पर्शून गेले. टीम इंडियाने यापूर्वीही असे केले आहे. टीम इंडियाच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

इंग्लंड वेस्ट इंडिज संघांनीही हे केले

शनिवारी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांनीही गुडघ्यावर बसून ब्लॅक लाइफ मॅटरचा संदेश दिला. दोन्ही संघांनी सामन्यापूर्वी असे म्हटले होते की, ते वंशवादाविरोधातील लढाईला पाठिंबा देण्यासाठी असे करतील. भारत आणि पाकिस्तानच्या संघांनीही आपापल्या परीने या मोहिमेला पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT