IND vs NZ: Third t20 match playing XI these players will be in team  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: न्यूझीलंडला नमवण्यासाठी संघांत 'यांची' एन्ट्री तर काहींना विश्रांती

दैनिक गोमन्तक

T20 World cup च्या अपयशानंतर लगेचच मायदेशात सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धची T-20 मालिका जिंकूत भारतीय संघ आज आपला तिसराही सामना (IND vs NZ) जिंकून निर्भेळ यशमिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचवेळी सर्व राखीव खेळाडूंना अखेरच्या सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ऐतिहासिक ईडन गार्डनवर हा तिसरा सामना होणार आहे. T-20 संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या नेतृत्वाखालील पहिलीच मालिका जिंकण्याची कामगिरी बजावली आहे. आजचा सामना जिंकून विजयाची हॅट््ट्रिक करत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भरतीत टीम सज्ज असेल. (IND vs NZ: Third t20 match playing XI these players will be in team)

पूर्णवेळ T20 कर्णधार म्हणून रोहितची ही पहिलीच मालिका आहे ज्यात त्याने प्रथम दोन्ही नाणेफेक जिंकले. त्यामुळे परिस्थितीचा फायदा उठवण्यास मदत झाली आणि गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रोहितने यापूर्वी ईडन गार्डन्सवरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावा केल्या होत्या आणि कर्णधार म्हणून येथे पहिली मालिका 3-0 ने जिंकणे ही बाब त्याच्यासाठी सुवर्ण ठरणार अहे.

शानदार विजयानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडला त्याच्या नव्या भूमिकेशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आठवडाभरात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. रोहित आणि द्रविडला आता राखीव खेळाडूंना संधी देऊन चाचणी करायची आहे. सहाव्या गोलंदाजाची निवड झाल्यास, वेंकटेश अय्यरला गोलंदाजी करता येईल कारण हुगळी नदीचे वारे त्याला अतिरिक्त स्विंग देईल.

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप विजेत्या ऋतुराजला आजच्या सामन्यात निश्चितच संधी दिली जाऊ शकेल. त्यासाठी कदाचित केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. कालच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. वेगवान गोलंदाजीत अनुभवी भुवनेश्वर कुमारऐवजी आवेश खान आणि फिरकी गोलंदाजीत अश्विनऐवजी युझवेंद्र चहल असे बदल अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यरऐवजी ईशान किशन संघात असू शकेल.

ऋतुराज, आवेश खान आणि इशान किशन यांना या संधी दिली जाईल अशी आशा आहे . राहुलला चार दिवसांनंतर कसोटी मालिका खेळायची असल्याने त्याला वगळणे योग्य ठरेल.तसेच आवेश खानच्या जागी दीपक चहर किंवा भुवनेश्वर कुमारला स्थान मिळू शकते. अक्षर पटेल किंवा रविचंद्रन अश्विनच्या जागी युझवेंद्र चहल खेळू शकतो.

दरम्यान आज होणाऱ्या सामन्यापूर्वी ग्राऊंडबद्दल माजी राष्ट्रीय निवडकर्ता देवांग गांधी यांनी मैदानावर एकदा दव पडल्यामुळे नाणेफेक सामन्याचा विजेता ठरवेल. तो म्हणाला, 'सामन्यात नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असेल, तरीही निश्चितपणे काहीही सांगता येत नाही कारण दव पडल्यामुळे परिस्थिती बदलू शकते. माजी क्रिकेटपटू गांधी पुढे म्हणाले की, ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूर्णपणे अनुकूल नसेल. कोलकातामध्ये, वेगवान गोलंदाजांनाही खेळपट्टीची खूप मदत मिळेल, जरी फिरकी गोलंदाजांना काही समस्या असू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

SCROLL FOR NEXT