IND vs NZ: team India will win today Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: टीम इंडिया सज्ज, वानखेडेवर किवी आज होणार चितपट

भारताने किवींसमोर 540 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आणि मुंबईच्या खेळपट्टीचा विचार करता ही धावसंख्या गाठणे जवळजवळ अशक्य आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई कसोटीच्या (IND vs NZ) तिसर्‍या दिवशी टीम इंडियाची स्थिती अधिकच मजबूत झाली आहे आणि आता भारताचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी, भारताने (Team India) किवींसमोर 540 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आणि मुंबईच्या खेळपट्टीचा विचार करता ही धावसंख्या गाठणे जवळजवळ अशक्य आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 5 विकेट गमावल्या आहेत. न्यूझीलंडने टॉम लॅथम, विल यंग, ​​रॉस टेलर आणि डॅरेल मिशेल यांच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने (Ravichandran Ashwin) 3 तर अक्षर पटेलला (Axar Patel) एक विकेट मिळाली. तर टॉम ब्लंडेल शून्यावर धावबाद झाला. डॅरेल मिशेलने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक ठोकले आहे. भारताने आपला दुसरा डाव 7 गडी बाद 276 धावांवर घोषित केला. भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 62 धावांवर आटोपला.(IND vs NZ: team India will win today)

भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली. दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवालने 108 चेंडूत 62 धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने 97 चेंडूत 47 धावा पूर्ण केल्या , शुभमन गिल 75 चेंडूत 47 अक्षर पटेल 26 चेंडूत नाबाद 41आणि कर्णधार विराट कोहलीने आपल्या ३४ धावा 84 चेंडूत पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात 119 धावांत सर्व 10 बळी घेणारा फिरकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या डावात 106 धावांत चार बळी घेतले, तर रचिन रवींद्रने 56 धावांत तीन बळी घेतले. पटेलने या सामन्यात 225 धावा देत 14 विकेट घेतल्या. भारतातील कोणत्याही परदेशी गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

एजाज पटेलने 10 बळी घेतल्यानंतरही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. भारताकडून 70 षटकात 25 चौकार आणि 11 षटकार मारले गेले. कालच्या सामन्यात ऋद्धिमान साहा वगळता प्रत्येक भारतीय फलंदाजाने षटकार मारला आहे . अक्षर पटेलने एकट्याने झंझावाती खेळीत तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. श्रेयस अय्यरने 8 चेंडूत 14 धावांच्या खेळीत दोन षटकार ठोकले आहेत.

तर न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता दुसऱ्या डावात न्यूझीलंडला त्यांच्या वरिष्ठ फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण टॉम लॅथम आणि रॉस टेलरने निराशा केली. दोघेही 6-6 धावा करून बाद झाले. विल यंगने 20 धावा केल्यानंतर विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण अश्विनने त्याचा खेळ संपवला. यानंतर मिशेल आणि हेन्री निकोल्समध्ये 73 धावांची भागीदारी झाली पण ही जोडी अक्षर पटेलने तोडली. टॉम ब्लंडेल झटपट धावबाद झाल्याने न्यूझीलंडने 5 वी विकेट गमावली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रवींद्र आणि हेन्री निकोल्स क्रीजवर होते. दोघांमध्ये 49 चेंडूत 11 धावांची भागीदारी झाली आहे. भारताला आता चौथ्या दिवशी विजयासाठी 5 विकेट्स काढायच्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT